A Manifesto and Political Platform for Making Indians Prosperous

भारतीय नागरिकांमध्ये समृद्धीची मागणी निर्माण करणे, संपत्ती नष्ट करणारे हस्तक्षेप बंद करणे आणि व्यापक संपत्ती निर्मितीला चालना मिळेल अशी कृतियोजना आखणे हे ‘नई दिशा’चे उद्दिष्ट आहे.

नवे काही

आर्थिक जाहीरनामा

भारतात संपत्तीनिर्मिती अयशस्वी ठरण्याची प्रमुख कारणे म्हणजे अकार्यक्षम प्रशासन, विकसित न झालेले नेतृत्व आणि चुकीची धोरणे. आता वेळ आली आहे- आपण सर्वांनी आव्हान स्वीकारत प्रशासनाचे आणि राजकारणाचे नवे मॉडेल आखून देशाची दिशा बदलायला हवी.

आर्थिक जाहीरनामा वाचा

धन वापसी

ही क्रांतीकारी कल्पना आहे, ज्याद्वारे गरिबी निर्मूलन होईल, युवा भारताला ज्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या कोट्यवधी नोकऱ्या निर्माण होतील आणि सरकार अधिक प्रभावी बनेल. धन वापसी हा एक असा उपाय आहे, जो अंतिमत: सर्व भारतीयांना संपत्ती निर्मितीसाठी आणि समृद्धीसाठी काय करायला हवे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देते.

धन वापसी करता अधिक वाचा

चळवळीमध्ये सामील व्हा

नई दिशा :वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नई दिशा’ नेमके काय आहे? त्यामागे नेमक्या कोण व्यक्ती आहेत? तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे?

भारताला संपन्न-समृद्ध बनवावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठीचे ‘नई दिशा’ हे व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मितीसाठी नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मूलगामी ध्येय आहे. ‘नई दिशा’ची समृद्धीची ५ तत्त्वे आणि ५ उपाय यांतून देशात प्रशासनाचे आणि राजकारणाचे नवे प्रारूप आकाराला येईल.

नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.

नई दिशा चे उद्दिष्ट आणि मोहीम काय आहे

नई दिशा असे मानते की, गरिबी हे भारताचे प्राक्तन नाही. भारतीयांकरता चिरकाल टिकणारी अशी समृद्धी तीही दोन पिढ्यांत नाही, तर दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आणावी, असा आमचा दृष्टिकोन आहे.संपत्ती नष्ट करणाऱ्या कृती थांबवणे आणि ज्याद्वारे व्यापक संपत्ती निर्माण होईल अशा कृतींचा आरंभ करणे व भारतीयांना श्रीमंत बनवणे ही ‘नई दिशा’ची मोहीम आहे.

आमची समृद्धीविषयक मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत-
1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण

आमच्या व्यासपीठाविषयी आणि जाहीरनाम्याविषयी अधिक वाचा.

नई दिशा सर्व भारतीयांसाठी समृद्धी कशी आणू पाहात आहे?

‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.

लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...

धन वापसी विषयी अधिक वाचा

‘नई दिशा’ची संस्थात्मक रचना कशी आहे?

विवेकी, विचारांशी बांधील असणारे आणि ज्यांना भारतातील राजकारणात आमूलाग्र बदल आणायचा आहे, अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी ‘नई दिशा’ची टीम बनली आहे. जर तुम्हाला ‘नई दिशा’च्या ध्येयावर विश्वास असेल तर भारत समृद्ध बनविण्यासाठी आमच्यासोबत काम करा.

आमच्या ध्येयाचा एक भाग बना, ‘नई दिशा’त दाखल व्हा

नई दिशा’ समृद्धीचे आश्वासन देत आहे. तुम्हाला वाटते का, की प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये वाटल्याने भारतीय नागरिक श्रीमंत होतील?

३० कोटींहून अधिक भारतीय अत्यंत गरिबीत राहात आहेत. भारतीय कुटुंबाचे साधारण उत्पन्न हे प्रतिवर्षी केवळ १.२ लाख रुपये आहे. जर प्रत्येक भारतीय कुटुंबाकडे एक लाख रुपये सुपूर्द केले तर एकूण भारतीय कुटुंबांपैकी अर्ध्याहून अधिक कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट होईल. बहुतांश भारतीयांसाठी ही रक्कम मोठी आहे आणि त्यांचे जिणे आमूलाग्र बदलण्यासाठी हा पैसा त्यांच्या कामी येईल.

त्याचबरोबर, ‘नई दिशा’च्या इतर सुधारणांमुळे नव्या नोकऱ्यांची निर्मिती होईल, तसेच लहान आणि मोठ्या उद्योजकांसाठी व्यापार करणे अधिक सुकर होईल.

तुमचे उपाय हे मला आणखी एक जुमला वाटत आहेत- या वेळेस मोदींकडून नाही, तर नई दिशाकडून. मी तुमच्यावर का बरं विश्वास ठेवू?

जी संपत्ती खरे तर भारतीयांची आहे, आणि सध्या ती सरकारच्या ताब्यात असून ती विनावापर पडून आहे, अथवा तिचा गैरवापर होत आहे, ही संपत्ती नागरिकांना परत करण्याकरता नई दिशा कार्यरत राहील.

आमचा पब्लिक वेल्थ मॉनिटायझेशन रिपोर्ट वाचा.

जमीन आणि खनिज संपत्ती कोण विकत घेईल? राज्य सरकारकडून जमीन विनामूल्य मिळत असताना ते लिलावात का सहभागी होतील? परदेशी नागरिकांनाही त्यात सहभागी होता येईल का?

प्रारंभी, कोणतेही राज्य सरकार जमिनीसारखा मौल्यवान स्रोत उद्योगांना विनामूल्य देणार नाही. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीचे मालक नागरिक आहेत आणि जर उद्योगांना ती राज्य सरकारांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातील आपला योग्य वाटा सरकार आपल्यापासून हिरावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, कायद्याच्या राज्याच्या अभावी आणि नियमांच्या ओझ्यामुळे आज भारताच्या सार्वजनिक साधनसंपत्तीची खरेदी करण्यास कुणीही तयार नाही. जर लोकांकडे पैसा येईल आणि उद्योग करणे सोपे बनेल तेव्हा व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्रोतांची मागणी वाढेल.

भारतात संपत्ती खरेदी करण्याबाबत भारतीयांसारखेच परदेशी नागरिकांना आणि कंपन्यांनाही समान वागणूक मिळेल. भारतीय लोकांना अधिकाधिक पैसा मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काही स्रोतांबाबत अपवाद केला जाईल.

जर नजिकच्या भविष्यकाळात सार्वजनिक संपत्ती संपुष्टात आली तर... काय होईल?

आधी नमूद केल्यानुसार, प्रत्येक भारतील कुंटुंबाला वर्षाला एक लाख रुपये ५० वर्षे वितरित करता येतील, इतकी भारताची सार्वजनिक संपत्ती आहे. ही संपत्ती मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला कल्याणकारी उपक्रमांची अथवा कुठल्याही स्वरूपात पुनर्वितरण करायची गरज भासणार नाही. याचे कारण भारतीय तोपर्यंत त्यांचे भाग्य स्वत: लिहिण्याकरता भारतीय नागरिक श्रीमंत आणि समृद्ध बनत असतील.

गरिबांसाठी ‘नई दिशा’ काय करेल? त्यांच्यासाठी नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार नाही का?

‘नई दिशा’ प्रतिवर्षी प्रत्येक भारतीय कुटुंबाला एक लाख रुपये सुपूर्द करणार आहे. यामुळे गरिबांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक संधी वाढून मूलभूत सुधारणा होतील. यांमुळे संधींचा अभाव, सामाजिक आणि आर्थिक भांडवलाचा अभाव यांमुळे अनेक भारतीय जे गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत, त्यांच्या गरिबीचे दुष्टचक्र भेदता येणे शक्य होईल.

सार्वजनिक संपत्तीची नागरिकांना सुपूर्द करण्यासोबत भारतीय युवावर्गाला लक्षावधी नोकऱ्यांची आवश्यकता आहे, हेही ‘नई दिशा’ने ओळखले आहे. उद्योगांना पूरक वातावरण निर्मिती असल्याशिवाय तसेच उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल असल्याशिवाय नव्या नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकत नाही. ‘नई दिशा’ला अर्थव्यवस्था अधिक मुक्त करायची आहे, जेणे करून लोकांना उद्योग सुरू करणे आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणे शक्य होईल. त्याचबरोबर, नागरिक हा पैसा रोजगार कौशल्य अथवा शिक्षणाकरता उपयोगात आणू शकतात, ज्यामुळे चांगली नोकरी मिळू शकते.

अधिक माहितीसाठी वाचा

‘नई दिशा’ निधी उभारणी कशी करेल?

राजेश जैन यांनी नई दिशाचा प्रारंभिक निधी दिला आहे. अधिक निधीसाठी, लवकरच जे योगदान देऊ इच्छितात ते सर्व देऊ शकतील त्या सर्वांसाठी आम्ही लवकरच हे पारदर्शक पद्धतीने सुरु केले जाईल.

‘नई दिशा’ मध्ये सहभागी होऊन तुम्हीही आम्हाला मदत करू शकाल.

‘नई दिशा’ नेमके काय आहे? नई दिशाच्या मागे कोण लोक आहेत आणि कोणत्या गोष्टी साध्य करण्याची तुमची योजना आहे?

ज्यांची देश समृद्ध करण्याची इच्छा आहे, अशा भारतीय नागरिकांना एकत्र आणण्याचे ‘नई दिशा’ हे एक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मिती या अजेंड्यावर नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘नई दिशा’ची ५ समृद्धीची तत्त्वे आणि ५ उपाय यांच्याद्वारे देशातील प्रशासन आणि राजकारणाचे एक नवे प्रारूप निर्माण होईल. नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.

राजेश जैन, संस्थापक यांच्याविषयी अधिक माहितीसाठी वाचा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजेश जैन यांनी मोदींना विजयी केले होते, नाही का? तर मग आता ते हे सर्व का करत आहेत? ते उद्योजक आहेत; हे व्यासपीठ त्यांच्या व्यापाराला मदत करण्याकरता निर्माण झालेले नाही, हे मी कसे मानू?

हो, त्यांनी केले होते. २०१४ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर ७० वर्षांच्या चुकीच्या सरकारी धोरणांमध्ये नवे सरकार मूलगामी बदल करेल आणि भारताला समृद्धीच्या मार्गावर नेईल, अशी एक अपेक्षा होती. मात्र, नव्या सरकारने जुन्या धोरणाअंतर्गतच अनेक उपक्रम योजले आणि नव्या सरकारच्या अधिपत्याखाली भारत गरीब राष्ट्रच राहिले. सर्व राजकीय पक्ष एकसमान आहेत आणि लोकांच्या उत्थानाचे कोणतेही उपाय त्यांच्यापाशी नाहीत, हे राजेश यांच्या लक्षात आले. नव्या राज्यकर्त्यांपेक्षाही, आम्हाला देशाचे प्रशासन करणाऱ्या नियमांमध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आहे. त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये, राजेश यांनी शक्य तितकी एकात्मता दाखवली आहे आणि त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. मेहनतीवर विश्वास असणारे ते एक स्वनिर्मित व्यक्ती आहेत.

उद्योग वृद्धिंगत होण्याकरता भारताला समृद्ध होण्याची आणि लक्षावधी भारतीय युवकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे, हे राजेश जाणतात. ‘नई दिशा’द्वारे, उद्योजक म्हणून त्यांचा प्रवास सुरू राहणार आहे, मात्र दुसऱ्या पद्धतीने- राष्ट्रबांधणीद्वारे. भारतात परिवर्तन होणे आवश्यक आहे आणि या क्रांतीत आपल्यापैकी प्रत्येक जणाने राजकीय उद्योजकाची भूमिका निभावायला हवी, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

भारतीय समृद्ध बनवण्यासाठी आणि लाखो भारतीय युवकांनसाठी नोकऱ्या तयार करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे हे राजेश ह्यांना माहित आहे . उद्योजक म्हणूनचा त्यांचा प्रवास पुढेही चालू राहील , परंतु आता एका वेगळ्या क्षेत्रात- राष्ट्र उभारणीत ते आहे. भारताला परिवर्तन करण्याची गरज आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे

‘नई दिशा’ सुरू करण्यामागील राजेश यांच्या प्रेरणेविषयी वाचा

मी ‘नई दिशा’त का सहभागी होऊ?

गरिबी हे आपले विधिलिखित नाही, यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भारताला समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे यावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ‘नई दिशा’त सहभागी व्हायला हवे.

जर तुम्हाला आमच्या समृद्धीविषयीच्या तत्त्वांवर विश्वास असेल आणि जर तुम्ही या बदलाचा भाग होऊ इच्छित असाल तर ‘नई दिशा’मध्ये सहभागी व्हा.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

मी ‘नई दिशा’त कसे योगदान देऊ शकतो? ‘नई दिशा’च्या सदस्यांची भूमिका नेमकी काय असेल?

तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकता:

 • जर तुम्हांला आमच्या मोहिमेत स्वारस्य असेल, तर तुम्ही नावनोंदणी करा आणि सक्रिय सदस्य बना.
 • आमच्यासोबत तुम्हाला एका नव्या दिशेकडे चालण्याची प्रेरणा वाटत असेल तर आमचे कार्यकर्ता बना आणि आमचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा अथवा आमचे राजदूत अथवा कम्युनिटी लीडर बना. ‘नई दिशा’चे सदस्य हे भारताच्या भविष्याचे रचनाकार आहेत. आमचे सदस्य निर्णय घेण्यात आणि संस्थेच्या प्रत्येक स्तरावर सहभागी होतील.
 • नई दिशा भारताच्या भविष्याचे आर्किटेक्ट आहेत. सर्व स्तरांवर आमचे सदस्य निर्णय घेतील आणि संस्थेमध्ये सहभागी होतील
 • जर तुम्हाला आमच्या ध्येयावर विश्वास असेल तर ‘नई दिशा’त सहभागी व्हा.

  माझ्या नोंदणीकरता माझ्या मतदार ओळखपत्राची काय आवश्यकता आहे? माझी व्यक्तिगत माहिती (मतदार ओळखपत्र, दूरध्वनी क्रमांक आदी) सुरक्षित कसे राहतील?

  प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.

  तुमची माहिती आमच्यापाशी अत्यंत सुरक्षित आहे. अत्यंत सुरक्षित वातावरणात ती ठेवली जात आहे. तुमची गोपनीय माहिती आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि या माहितीचा अजिबात गैरवापर केला जाणार नाही, याची हमी आम्ही देतो..

  आता नई दिशात सामील व्हा

  मला ‘नई दिशा’त स्वारस्य आहे. पण माझ्याकडे मतदार ओळखपत्र नाही/ मला मतदार ओळखपत्र शेअर करायचे नाही. तरीही मी ‘नई दिशा’मध्ये सहभागी होऊ शकतो का?

  हो, आपण ‘नई दिशा’त सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला मतदार ओळखपत्रासह सदस्य म्हणून ‘नई दिशा’त सहभागी व्हायचे नसेल तर तुम्ही ‘नई दिशा’ला वेगवेगळ्या मार्गांनी पाठिंबा देऊ शकता. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

 • a) सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा आणि ही चळवळ वाढावी, याकरता ‘नई दिशा’विषयी कुटुंब, मित्रमैत्रिणींना माहिती द्या.
 • b)नई दिशा कार्यक्रम आणि बैठका येथे स्वयंसेवक किंवा स्थानिक अध्यायात मदत करतील
 • नई दिशा’ला मदत करताना तुम्ही गुण कमावू शकता. सदस्य म्हणून लाभ प्राप्त होण्याकरता तुमच्यापाशी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही मतदार ओळखपत्रानिशी साइनअप केल्यानंतर तुमचे अँक्टिव्हिटी पॉइंट्स तुमच्या अपग्रेडेट प्रोफाइलवर स्थलांतरित केले जातील.

  आमच्या ध्येयाचा भाग बना. ‘नई दिशा’चे सदस्य बना.

  नई दिशा आपल्या सदस्यांबरोबर कशी सहभागी होईल?

  ‘नई दिशा’ अँप, ब्लॉग, फोरम आणि फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप आदी विविध सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या डिजिटल व्यासपीठांद्वारे आपल्या सदस्यांशी संपर्कात राहील आणि त्यांना पाठिंबा देईल. ‘नई दिशा’चा पाठिंबा जसजसा वाढेल, तसतसे आमचे स्थानिक अध्याय कार्यरत होतील, ज्याद्वारे नियमित बैठका आणि उपक्रम आयोजित केले जातील.

  ‘नई दिशा’च्या टीममध्ये सहभागी व्हा

  अधिक प्रश्न विचारा. FAQs.

  अपडेट राहा

  तुमच्या व्हॉट्स अप क्रमांकावर दररोजच्या ताज्या घडामोडी मिळवा.

  आपण आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद.

  एसएमएस अपडेटसाठी मिस कॉल द्या ९२२३९०११११

  ईमेलवर अपडेट मिळवा

  आपल्या इनबॉक्समध्ये दैनिक अपडेट मिळवा

  ई-मेल वर अपडेट्स नकोत का?

  मोबाइलवर अपडेट मिळवा