धन वापसी : भारतीयांना समृद्ध करणारी भव्य कल्पना !

गरिबीचे निर्मूलन करणारी, युवा पिढीला अत्यावश्यक असलेल्या करोडो नव्या नोकऱ्या निर्माण करणारी आणि सरकारला अधिक परिणामकारक करणारी धन वापसी ही एक क्रांतीकारी कल्पना आहे. आर्थिक विकासाला चालना देणारी देशांतर्गत ताकद यामुळे वाढेल. धन वापसी हे एक नवे आर्थिक प्रारूप आहे, जे सर्व भारतीयांना लवकरात लवकर समृद्धीच्या मार्गावर पोहोचवेल.

धन वापसी म्हणजे देशाच्या नागरिकांना सार्वजनिक संपत्ती परत करणे. ही सार्वजनिक संपत्ती जमीन, सार्वजनिक उपक्रम (सार्वजनिक क्षेत्राचे उपक्रम) आणि खनिजांमध्ये कुलुपबंद आहे. नई दिशाच्या अंदाजानुसार या रकमेतून, देशातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम येतील. धन वापसी उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये सुपूर्द केले जातील.

सार्वजनिक आणि खासगी संपत्ती

सर्वप्रथम आपण खासगी आणि सार्वजनिक संपत्तीमधील फरक लक्षात घेऊयात. खासगी संपत्ती जी आपल्या मालकीची असते त्यात घर, कार, मोटारसायकल, सोने आदी वस्तू येतात. ही आपली खासगी मालमत्ता आहे. उलटपक्षी, काही गोष्टींवर आपली एकत्रित मालकी असते, पण त्या गोष्टींवर सरकारचे नियंत्रण असते. सार्वजनिक संपत्तीचा वापर कसा करायचा, हे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी ठरवतात. आपल्या संपत्तीवर सरकारला नियंत्रण करू देणे म्हणजे बँक व्यवस्थापकांना जणू आपल्या वैयक्तिक ठेवी त्यांचेच पैसे असल्यासारखे वापरण्यास परवानगी देणे.

आपण किती गरीब आहोत?

देश म्हणून आपण श्रीमंत आहोत, मात्र भारतीय म्हणून आपण खूपच गरीब आहोत. सर्वसाधारण भारतीय कुटुंब महिन्याकाठी दहा हजार रुपये कमावते अथवा प्रतिवर्ष १.२ लाख रुपये कमावते. देशातील बहुतांश लोक शेतात मजुरी करण्यात किंवा मनरेगा योजनेअंतर्गत महिन्याला सहा हजार रुपये कमावण्यात किंवा कमी औपचारिक क्षेत्रातील महिन्याकाठी १५ हजार रुपये वेतन देणाऱ्या कामांमध्येच अडकले आहेत.

देशातील ९० टक्के घरांची निव्वळ संपत्ती साडे सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे, याचाच अर्थ असा की, सर्वसाधारण भारतीय कुटुंबाची निव्वळ संपत्ती केवळ २-३ लाख रुपये आहे. इतक्या मर्यादित संपत्तीसह आणि उत्पन्नासह कुटुंबांकरता समृद्धीच्या मार्गावर पोहोचणे कठीण बनले आहे. तरुण मुलांकडे खूप बुद्धिमत्ता आहे, पण त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणेच जवळपास अशक्यप्राय बनले आहे?

धन वापसीने कशी मदत होईल?

धन वापसी हे साऱ्या स्तरांकरता आणि निसर्गत: सारखेपणा जपणारी संकल्पना आहे. लोकांना त्यांची संपत्ती पुन्हा सुपूर्द करू प्रत्येक कुटुंबाला आयुष्यात सुरुवात करणे शक्य बनेल. जी रोख रक्कम अथवा कर्ज यांच्या अभावामुळे त्यांची गरिबी कायम राहिली, ते आता संपेल. धन वापसीने प्रत्येक कुटुंबाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे ते समृद्धीच्या मार्गावर पोहोचतील.

असे म्हटले जाते की, आपल्या पूर्वजांनी आपल्या मालकीचे असंख्य सोने लपवून ठेवले आहे, परंतु आपल्याला त्याबद्दलही माहिती नाही. सोने आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकेल आणि त्याद्वारे तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. हे सोने तुम्हाला वेगळेच जीवन जगायला मदत करेल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करायलाही मदत करेल. जर तुम्ही तुमचे आयुष्य अधिक चांगले करू शकण्यासाठी वापरले नाहीत, तर तुम्ही ते कधी कराल?

भारत आता एका वळणावर उभे आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या सरकारांनी दशकानुदशके भारतीयांना संपत्ती निर्माण करण्याचे स्वातंत्र्य नाकारले आहे. धन वापसी हा एक अंतिम उपाय आहे, जो सर्व भारतीयांना संपत्ती निर्मिती आणि समृद्धीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देईल. उद्या : संपत्ती कुठे आहे?