चळवळीमध्ये सामील व्हा

"What prevents India from achieving its destiny is this: the system that denies us freedom to create wealth.That system has to be dismantled, root and branch. We have to change the system, not just replace one political party with another, or one government with another."

अधिक वाचा

नय दिशा काय आहे?

भारतीय नागरिकांना समृद्ध बनविण्याकरता निर्माण करण्यात आलेले ‘नई दिशा’ हे स्वतंत्र राजकीय व्यासपीठ आहे. आपला देश जशा पद्धतीने वाटचाल करत आहे, त्यात मूलभूत बदल घडवण्यासाठी साऱ्या भारतीयांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे.

भारतीय नागरिकांना समृद्ध बनविण्याकरता निर्माण करण्यात आलेले ‘नई दिशा’ हे स्वतंत्र राजकीय व्यासपीठ आहे. आपला देश जशा पद्धतीने वाटचाल करत आहे, त्यात मूलभूत बदल घडवण्यासाठी साऱ्या भारतीयांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे.अशा तऱ्हेने तयार झालेले ‘नई दिशा’ हे पहिलेच व्यासपीठ आहे. आपला देश जशा पद्धतीने चालतो, त्यात मूलगामी बदल करण्यासाठी सर्व भारतीयांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जर तुमच्या देशाविषयी, मतदारसंघाविषयी, देश समृद्ध बनविण्याविषयी तुमच्या काही कल्पना, काही विचार असतील, जर देश समृद्ध बनविण्यात तुम्हाला काही योगदान द्यायचे असेल तर हे तुमचे व्यासपीठ आहे. हा समविचारी व्यक्तींचा मंच आहे, एक व्यासपीठ आहे!

आम्ही जणू राजकारणातील उबर आहोत, असं तुम्हाला वाटेल. आमचा राजकीय पक्ष नाही, अथवा आमचे स्वत:चे असे उमेदवारही नाहीत. नव्या दिशेला वाटचाल करणाऱ्या भारताचे नेतृत्व करू शकणाऱ्या स्थानिक नेत्यांना संधी देणारे आमचे डिजिटली सक्षम असे व्यासपीठ आहे.

अधिक माहितीसाठी वाचा

‘नई दिशा’चा दृष्टिकोन आणि ध्येय काय आहे?

गरिबी हे भारताचे प्राक्तन नव्हे, यांवर ‘नई दिशा’ला विश्वास आहे. भारतीयांसाठी समृद्धी आणावी आणि तीही शतकानंतर नव्हे, तर दोन निवडणुकांच्या दरम्यान आणावी, हे आमचे ध्येय आहे.

समृद्धी हवी असणाऱ्या मतदारांना आणि ज्यांना अशी समृद्धी नागरिकांना पोहोचती करायची आहे, अशा उमेदवारांना एकत्र आणणे, हे आमच्या ‘मोहीम ५४३’चे ध्येय आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अशा जोशपूर्ण स्थानिक नेत्यांना उमेदवारी देऊन ५४३ जागा बहुमताने जिंकाव्यात, पुढील सरकार स्थापन करावे आणि कधीही न संपणाऱ्या समृद्धीच्या वाटेवर भारतीयांना पोहोचवण्याचा अजेंडा राबवावा, अशी आमची योजना आहे.

पुढील तत्त्वे आमची मार्गदर्शक आहेत : 1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण
6. वेळेवर न्याय
7. सार्वजनिक संपत्ती सुपूर्द करणे

नई दिशा सर्व भारतीयांसाठी समृद्धी कशी आणू पाहात आहे?

‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.

लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...

अधिक माहितीसाठी वाचा

गेल्या ७० वर्षांत जे कुणी करू शकले नाही, ती आश्वासने तुम्ही पूर्ण करू शकाल, असे तुम्हाला कसे वाटते?

राजकीय पक्षांना आणि सत्ताधारी नेत्यांना भारताची दिशा बदलण्याची काहीही प्रेरणा नाही आणि याच कारणामुळे भारत गरिबीच्या आणि पिळवणुकीच्या ब्रिटिशांपासून चालत आलेल्या मार्गावर आजही वाटचाल करत आहे.

त्यांना केवळ सत्तेत राहण्यात रस आहे आणि म्हणून सरकार ज्या सवलती देईल, त्यावर भारतीयांना अवलंबित ठेवण्यात त्यांना स्वारस्य आहे, कारण यांतूनच त्यांना मते मिळू शकतील. ‘नई दिशा’ त्यांची समृद्धीची तत्त्वे उपयोगात आणणार आहे, जी आजपर्यंत देशाला समृद्ध करण्याचे आश्वासन देणाऱ्या कोणत्याही सरकारने वापरून पाहिलेली नाहीत. ‘नई दिशा’च्या समर्थकासाठी अथवा नेत्याकरता, सत्ता हे केवळ साधन आहे, ध्येय नव्हे.

आमच्या उद्दिष्टाबाबत अधिक वाचा

इतके सारे राजकीय पक्ष असताना, आणखी एका पक्षाची गरज नेमकी का आहे?

जरी आपल्याकडे अनेक राजकीय पक्ष असले तरी फारसे काही बदललेले नाही. प्रत्येक पक्षाचा संदेश हा आडनाव, जात, कोटा, सवलती आणि कथित इतिहासावर आधारित असतो. समृद्धीचे केवळ आश्वासन देण्यात येते, मात्र ती कधी प्राप्त होत नाही.

नई दिशा एक व्यासपीठ आहे, पक्ष नाही. मतदार आणि नेत्यांना जोडणे आणि त्यांना विकास आणि न्याय राजकारणात गुंतवून ठेवणे हे त्याचे ध्येय आहे. भारतामध्ये जे राजकारण केले जाते हे बदलण्याची इच्छा आहे

जर तुम्ही सद्य राजकीय चित्राबाबत खूश नसाल, तर आमच्यात सहभागी व्हा.

‘नई दिशा’ गरिबांकरता काय करेल ?

‘नई दिशा’ प्रतिवर्षी प्रत्येक भारतीय कुटुंबाला एक लाख रुपये सुपूर्द करणार आहे. यामुळे गरिबांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक संधी वाढून मूलभूत सुधारणा होतील.

यांमुळे संधींचा अभाव, सामाजिक आणि आर्थिक भांडवलाचा अभाव यांमुळे अनेक भारतीय जे गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत, त्यांच्या गरिबीचे दुष्टचक्र भेदता येणे शक्य होईल.

अधिक माहितीसाठी वाचा

तुम्ही भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आप चा भाग आहात का? केवळ मत विभागणीकरता तुम्ही अस्तित्वात आला आहात का?

नाही, ‘नई दिशा’ कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. राजकारणाच्या सद्य परिस्थितीला कंटाळलेल्या, अग्रेसर विचार करणाऱ्या भारतीयांचे स्वतंत्र व्यासपीठ आहे.

जर तुम्ही सद्य राजकीय चित्राबाबत खूश नसाल, तर आमच्यात सहभागी व्हा.

प्रत्येक राजकारणी भ्रष्ट आहे. तुमचा पक्ष भ्रष्टाचाराला कसे तोंड देईल?

राजकारण हे आमचे करिअर नाही, राजकारणाचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही इथे आहोत. म्हणूनच इतर पक्षांप्रमाणे एखाद्या कुटुंबाच्या इच्छेनुसार अथवा वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय पद्धतीने नेते निवडले जातात, त्यांच्यासारखा आमचा पक्ष नाही.

‘‘नई दिशा’’चे व्यासपीठ संपूर्णत: खुले आणि पारदर्शी आहे. स्थानिक नेते हे पारदर्शी निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जातात आणि प्रत्येक सदस्य निवडणुकीला उभा राहू शकतो. कुठल्याही मतदारसंघातील पाच टक्क्यांपर्यंत ‘नई दिशा’ पोहोचल्यानंतर, त्या मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाच्या पदाकरता निवडणूक घेतली जाईल. कुठल्याही वेळेस आमच्या वेबसाइटवर ‘नई दिशा’च्या सदस्यांविषयीची सर्व माहिती तपासणीकरता सर्वांसाठी उपलब्ध असेल.

आमच्या उद्दिष्टाबाबत अधिक वाचा

‘नई दिशा’ हा भारताच्या निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला राजकीय पक्ष आहे का?

नाही, नई दिशा एक राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत नाही. आम्ही असे एक व्यासपीठ आहे जे शासन आणि राजकारणाचे चांगले मॉडेल करेल.

अधिक माहितीसाठी वाचा

मी ‘नई दिशा’त का सहभागी होऊ?

जर आपल्याला असे वाटले की दारिद्र्य आपल्या नशीब नाही तर आपण नई दिशाशैलीमध्ये सामील होणे आवश्यक आहे. जर आपण विश्वास ठेवला की, भारताच्या लोकांच , भारताला एक समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनविण्याचा महत्वाचा कर्तव्य आहे, तर तुम्ही नई दिशात सहभागी व्हा

जर आपण आमच्या समृद्धी तत्त्वांवर विश्वास ठेवला आणि या बदलाचा एक भाग होऊ इच्छित असाल, तर आमच्या आंदोलनास समर्थन द्या.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

नयी दिशामध्ये कोण लोक सहभागी आहेत?

नई दिशा राजेश जैन यांचे पुढाकार आहेत. आमच्या सदस्यांमध्ये सर्व प्रकारचे लोक - विद्यार्थी, व्यवसायकर्ते, वकील, अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी आणि तरुण व्यावसायिक यांचा समावेश आहे.

राजेश जैन बद्दल अधिक वाचा.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

राजेश जैन यांनी २०१४च्या निवडणुकीत मोदींना जिंकण्यास हातभार लावला होता ना? ते हे सारे का करत आहेत?

हो त्यानी केले. त्यांना लवकरच लक्षात आले की भारतातील सर्व विद्यमान पक्ष समान आहेत आणि लोकांना उत्थान करण्याचे कोणतेही उपाय नाहीत.

नई दिशा, त्याच्या पुढाकाराने अखेरीस आम्हाला मागील सरकारच्या वाईट धोरणांपासून मुक्त करण्यास मदत करेल आणि समृद्धीच्या मार्गावर भारताचे नेतृत्व करेल

राजेश यांनी नई दिशा सुरु करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल अधिक वाचा.

‘नई दिशा’ हे व्यासपीठ एका उद्योजकाने सुरू केले आहे. मला कसे कळेल, की हे व्यासपीठ केवळ त्यांच्या उद्योगाला मदत करण्याकरता तयार करण्यात आलेले नाही?

आपल्या कारकिर्दीत, राजेश अत्यंत अखंडत्व टिकवून ठेवतात आणि कधीही भ्रष्टाचाराचा आरोप लागला गेला नाही आहे ते कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात ,

भारतीय समृद्ध बनवण्यासाठी आणि लाखो भारतीय युवकांनसाठी नोकऱ्या तयार करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे हे राजेश ह्यांना माहित आहे . उद्योजक म्हणूनचा त्यांचा प्रवास पुढेही चालू राहील , परंतु आता एका वेगळ्या क्षेत्रात- राष्ट्र उभारणीत ते आहे. भारताला परिवर्तन करण्याची गरज आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे

राजेश ह्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल वाचा.

तुम्ही केवळ एक व्यासपीठ आहात, मी केवळ एक मतदार आहे. आपण बदल घडवू शकाल का?

एका मताने काय फरक पडणार, असा विचार तुमच्यासारखेच लक्षावधी लोक करतात. मात्र, देशाचे सरकार कित्येकदा एक तृतीयांश बहुमताने निर्माण झाले आहे.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, ८३.७ कोटी अर्हताप्राप्त मतदारांपैकी २८.७ कोटी मतदारांनी मत दिले नव्हते. विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीला १७ कोटी मते मिळाली. जर २८.७ कोटी नागरिकांनी मतदान केले असते, तर निवडणुकीचा निकाल वेगळा असता.

बहुतेक लोक मत देत नाहीत कारण त्यांना वाटते की यामुळे काही फरक पडणार नाही. डेटा दर्शविल्याप्रमाणे, हे सत्य नाही. आपण सर्वांनी बदलासाठी एकत्र मतदान केले तर कोणीही राजकारण्यांच्या बंधनांपासून भारताला मुक्त करू शकते आणि देशाला नई दिशा देऊ शकते

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

मी नई दिशात कसा योगदान करू शकतो?.

तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकता:

अ. जर तुम्हांला आपल्या देशाच्या सद्य राजकारणामुळे त्रास होत असेल अथवा तुम्ही या परिस्थितीला कंटाळले असाल आणि तुम्हाला ‘नई दिशा’ कशा प्रकारे बदल घडवून आणू शकेल हे समजून घ्यायचे असेल तर आमच्या ई-मेलसाठी अथवा मोबाइल अपडेट्ससाठी साइन-अप करा. आ. जर तुम्हाला आमच्या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर तुमच्या मतदार ओळखपत्रासह नोंदणी करा आणि सक्रिय सदस्य बना. इ. तुम्ही आमच्यासह नव्या दिशेकडे चालण्यास प्रेरित असाल तर आमचे कार्यकर्ता बना आणि आमच्या संदेशांचा प्रसार करा अथवा आमचे कम्युनिटी लीडर बना.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

‘नई दिशा’ निधी उभारणी कशी करेल?

‘नई दिशा’ची प्रारंभीची निधी उभारणी राजेश जैन यांनी केली आहे. अधिक निधीसाठी, ज्यांना यात योगदान द्यायचे असेल, त्यांच्यासाठी लवकरच आम्ही योजना खुली करू. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीरित्या राबवली जाईल.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘नई दिशा’ची भूमिका नेमकी कशी असेल ?

भारतात प्रत्येक मतदारसंघात किमान 5% मतदारांच्या समर्थनासाठी नई दिशा पारंपारिक राजकीय पक्षांप्रमाणे, नई दिशा समर्थक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या स्थानिक नेत्यांचा अंतर्गत निवडणुकीत ('प्रायमरीज') निवडतील.

‘नई दिशा’चे सदस्य निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांविषयी आपला अभिप्राय देतील आणि अशा प्रकारे, मतदान करण्याआधी प्रत्येकाला उमेदवारांची माहिती उपलब्ध होईल. ‘नई दिशा’च्या उमेदवारांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले की, ‘नई दिशा’चे सदस्य (निवडून आलेले खासदार) मत देऊन भावी पंतप्रधान निवडतील.

आमच्या उद्दिष्टाबाबत अधिक वाचा

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

नोंदणीकरता मतदार ओळखपत्राची गरज का आहे?

प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.

आमचे मिशन 543 आणि मतदान आयडी महत्त्वाचे का आहे याबद्दल अधिक वाचा.

माझी वैयक्तिक माहिती (मतदार ओळखपत्र, दूरध्वनी क्रमांक आदी) सुरक्षित राहील का?

तुमची माहिती आमच्यापाशी पूर्णत: सुरक्षित आहे. ती अत्यंत सुरक्षित वातावरणात साठवलेली आहे. तुमची माहितीचे खासगीपण आणि त्याची गोपनीयता याला आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे आणि आम्ही त्याचा गैरवापर करणार नाही.

आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

अधिक शंका आहेत ? आम्हाला विचारा

आपल्या चौकशीबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच आपल्याकडे परत येऊ.