भारतासाठी नई दिशा

आम्हाला स्पष्ट झाले आहे की, राजकीय व्यासपीठ हे ‘नई दिशा’च्या कल्पना समजून घेण्यात आणि त्या कल्पनांचा प्रसार करण्याच्या मार्गात येत आहेत.

वर्षभरात किंवा त्याहून कमी अवधीत आपल्याकडे निवडणुका होती. पाकिस्तान, ध्रुवीकरण आणि अर्थातच वर्षानुवर्षे निवडणुकीच्या काळातील चलनी नाणं अर्थात गरिबी हे घटक मध्यवर्ती स्थान प्राप्त करतील. राजकारण्यांच्या या खेळात व्यत्यय आणून आगामी निवडणूक समृद्धी या नव्या कल्पनेभोवती केंद्रित केली तर…

समृद्धी भारतीयांना नेहमीच चकवा देत राहिली. सर्वसाधारण भारतीय व्यक्तीपेक्षा सर्वसाधारण अमेरिकी व्यक्तीचे उत्पन्न ३० पट अधिक आहे, दक्षिण कोरियन व्यक्तीचे उत्पन्न १५ पट अधिक आहे, पोर्तुगीज आणि ग्रीक व्यक्तीचे दहा पट अधिक आहे आणि चिनी व्यक्तीचे पाच पट अधिक आहे. आपण भारतात समृद्धी का निर्माण करू शकत नाही?

Income Gap Between Countries

याचे उत्तर आपण गरिबीला कसे तोंड देतो, यांमध्ये दडलेले आहे. ‘गरिबी हटाव योजने’पासून अशा योजनांच्या आधुनिक अवतारापर्यंत दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न झालेले अथवा होताना दिसतात. गरिबी ही जगातील मूलभूत स्थिती आहे. उपस्थित करण्याजोगा खरा प्रश्न म्हणजे ‘संपत्ती कशामुळे निर्माण होते?’ गरिबीसाठी नव्हे, तर समृद्धीसाठी कृतीची आवश्यकता असते.

गरिबीवर लक्ष केंद्रित करून, सरकार संपत्ती निर्माण करण्याऐवजी संपत्ती नष्ट करते. काही गोष्टींवर बंदी आणून सरकार समृद्धी वाढविण्याऐवजी गरिबी कायम राखतात. मानवी कृती ही भरभराटीसाठी प्रयत्नशील असते; मात्र, सरकारच्या बहुतांश कृती या लोकांच्या समृद्धीमध्ये अडथळा आणतात.

गेली अनेक वर्षे, देशातील विविध सरकारांनी आपले लक्ष चुकीच्या विचारांवर आणि चुकीच्या आर्थिक प्रारूपावर केंद्रित केले आहे. खरे तर, भारतीय जनता दहा पट अधिक श्रीमंत व्हायला हवी होती, पण तसे घडले नाही. भारतीयांच्या संपत्तीतील ९० टक्के वाटा हा देशाच्या सरकारांनी चोरला आहे.

भारतीयांना समृद्ध बनविण्याचा एक नवा मार्ग आहे. तो म्हणजे ‘धन वापसी’, भारतीय नागरिकांना देशाच्या सार्वजनिक संपत्तीतील त्यांचा वाटा सुपूर्द करणे. प्रत्येक भारतीय कुटुंबाचा देशाच्या सार्वजनिक संपत्तीतील वाटा हा ५० लाख रुपयांहून अधिक आहे. हा वाटा जमीन, सार्वजनिक उपक्रम, खनिजे आणि सरकारी वायफळ खर्च यांत कुलुपबंद झाला आहे. संपत्तीतून श्रीमंती येते. प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रति वर्ष एक लाख रुपये परत करता येतील, त्याच्या जोडीने करही कमी करता येतील.

भारताला अशा बदलाची आवश्यकता आहे. बदल हा नेहमी आपल्यापासून सुरू व्हावा लागतो. जेव्हा आपण समृद्ध होण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग समजून घेण्याची सुरुवात करू, तेव्हाच राजकारणी आपल्या मागण्यांच्या पूर्तीकरता म्हणून स्वत:च्या कृती बदलतील. ही ‘नई दिशा’ची मोहीम आहे. एकत्रितरीत्या, आपण पुढील निवडणुकीचा प्रमुख मुद्दा हा समृद्धी आणि समृद्धीविरोधी यंत्रणेची मोडतोड करणे हा करू शकतो. एकत्रितरीत्या, आपण भारताचे पहिले समृद्धी पंतप्रधान निवडू शकतो.

**

आम्ही एका आर्थिक जाहीरनाम्यासह आणि राजकीय व्यासपीठासह काही महिन्यांपूर्वी NayiDisha.com सुरू केली. आम्हाला स्पष्ट झाले आहे की, राजकीय व्यासपीठ हे ‘नई दिशा’च्या कल्पना समजून घेण्यात आणि त्या कल्पनांचा प्रसार करण्याच्या मार्गात येत आहेत. म्हणून, आम्ही राजकीय मंचाची कल्पना सोडून देत आहोत आणि आता समृद्धीच्या कल्पनांच्या प्रसारावर- प्रामुख्याने ‘धन वापसी’च्या कल्पनेवर ‘नई दिशा’चे लक्ष पूर्णपणे केंद्रित राहील.

या पुढच्या वाटचालीत, संपत्तीनिर्मिती कशामुळे होते, हे तुम्हाला समजून घेता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. सत्ताधाऱ्यांच्या कृतीचा अर्थ सार्वजनिक निवडीच्या सिद्धान्ताद्वारे अर्थात ‘पब्लिक चॉइस थिअरी’द्वारे समजावून सांगत घटनांकडे नव्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघता यावे, याकरता मदत करू. आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आम्ही अधिक खोलवर पोहोचू. सरकारची योग्य भूमिका काय असायला हवी, सरकारने काय करायला हवे, सरकारने काय करण्याची आवश्यकता नाही, हे तुम्ही समजून घ्यावे, यासाठी आम्ही मदत करू. ‘नई दिशा’ची समृद्धीची पाच तत्त्वे आणि सुरुवातीचे पाच उपाय देशाला समृद्धीच्या नव्या मार्गावर कसे नेतील, हेही आम्ही दाखवून देऊ.