प्रत्येक भारतीयाला समृद्ध बनविण्याचा मार्ग हा व्यक्तीस्वातंत्र्य देणाऱ्या, खासगी संपत्तीचे संरक्षण करणाऱ्या, कायद्याच्या राज्याचे पालन करणाऱ्या आणि मुक्त बाजारपेठेला वाव देणाऱ्या मर्यादित आणि बळकट सरकारद्वारे प्राप्त होऊ शकतो.


राजेश जैन यांच्याविषयी

राजेश तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत आणि आशियातील डॉटकॉम क्रांती सुरू करण्यात अग्रेसर असलेल्यांपैकी एक आहेत. त्यांनी १९९० च्या उत्तरार्धात भारतातील पहिले इंटरनेट पोर्टल निर्माण केले. त्यानंतर त्यांनी आजच्या घडीला भारतातील सर्वात मोठी डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. राजेश आपली उद्योजकता सुरू ठेवणार आहेत, मात्र वेगळ्या प्रकारे– राष्ट्रबांधणीतील योगदानाद्वारे. भारताचा कायापालट होण्याची आवश्यकता आहे, यावर राजेश यांचा विश्वास आहे आणि या क्रांतीत आपल्याला राजकीय उद्योजकाची (पोलिटिकल आंत्रप्रेन्युर) भूमिका बजावावी लागेल.

***

राजकीय उपक्रम

नई दिशा, राजेश यांच्या पुढाकाराने भारतीय समृद्ध बनविण्यासाठी एक राजकीय व्यासपीठ आहे.

राजेश यांच्या याआधीच्या ‘निती डिजिटल’ या राजकीय उद्योगाने २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता भारतीय जनता पार्टीचे निवडणूक कॅम्पेन केले होते. त्यावेळेस सुमारे शंभर जणांची टीम दोन वर्षे सेंटर डिजिटल मीडिया स्पेस (NitiCentral.com), निवडणुकीचा डेटा आणि विश्लेषण (IndiaVotes.com), कार्यंकर्त्यांचे व्यासपीठ (India272.com) या संबंधीचे काम पाहत होती. येत्या निवडणुकीत भाजपाची लाट येईल, अशा मोहिमेवर आपण लक्ष केंद्रित केले आहे, असे जून २०११ मध्ये ‘project 275 for 2014’ या emergic.org वरील ब्लॉगपोस्टद्वारे जाहीररीत्या सांगणारे राजेश हे पहिली व्यक्ती होते.

उद्योजक उपक्रम

ई-मेल आणि मोबाईलद्वारे कंपन्यांना डिजिटल कम्युनिकेशन्स, मार्केटिंग ऑटोमेशन आणि कॅम्पेन मॅनेजमेन्ट पुरवणारी आघाडीची कंपनी ‘नेटकोर सोल्युशन्स’चे राजेश संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. उत्पादन आणि प्लॅटफॉर्म सोल्यूशन्यद्वारे सुमारे दोन हजार देशी- विदेशी कंपन्यांना ‘नेटकोर’ सेवा प्रदान करते आणि ‘मेसेजिंग गेटवेज’द्वारे सुमारे १० अब्ज मेसेजेस (ई-मेल आणि एसेमेस) पुरवते.

१९९५ साली राजेश यांनी ‘इंडियावर्ल्ड कम्युनिकेशन्स’ हा उद्योग सुरू केला होता, जो नोव्हेंबर, १९९९ साली ‘सत्यम इन्फोवे’ने ११५ दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीला विकत घेतला. भारतातील सर्वात मोठ्या इंटरनेट व्यवहारांपैकी हा एक व्यवहार मानला जातो. ‘इंडियावर्ल्ड’मध्ये समाचार (बातम्या), खेल (क्रिकेट), खोज (शोध) आणि बावर्ची (अन्न) या भारतकेंद्री विविध संकेतस्थळांचे सर्वात मोठे संकलन होते.

शिक्षण

राजेश जैन यांनी १९८८ मधून मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्याशाखेतून बी.टेक. पूर्ण केले. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एम.एस. पूर्ण केले. १९९२ मध्ये भारतात परतून स्वत:चा उद्योग सुरू करण्याआधी राजेश दोन वर्षे अमेरिकेच्या ‘एनवायएनइएक्स’ मध्ये कार्यरत होते.

मान्यता

राजेश दोन वर्षे अमेरिकेच्या ‘एनवायएनइएक्स’ मध्ये कार्यरत होते. त्यांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढारीपण सर्वांनी मान्य केले आहे आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना व्याख्याते म्हणून बोलावले जाते. २००० साली ‘टाइम’ आणि २००७ साली ‘न्यूजवीक’ मध्ये राजेश यांच्याविषयी ‘कव्हर स्टोरी’ छापून आली. सप्टेंबर २०१३ मध्ये ‘इकोनॉमिक टाइम्स’ने राजेश यांचा ‘सर्वोत्कृष्ट धोरणी व्यक्तिमत्त्व’ अशा शब्दांत गौरव केला.

***

राजेश यांच्या आयुष्यातील काही रंजक क्षणचित्रे :


इंडिया वर्ल्ड : भारतातील ‘डॉटकॉम’ क्रांतीची ठिणगी राजेशने मार्च १९९५ मध्ये पहिले इंटरनेट पोर्टल सुरू केले. ते विस्तारत सर्वात मोठे झाले. सत्यम इन्फोवे (सिफी) ने राजेशची २० जणांच्या टीमची कंपनी ५०० कोटी रुपयांना विकत घेतली. नोव्हेंबर १९९९ मध्ये झालेला हा आशियातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक होता.

‘टाइम’ आणि ‘न्यूजवीक’ने घेतलेली दखल: मार्च २००० साली झालेल्या आशियातील इंटरनेट युगाला आलेल्या सुगीच्या दिवसांविषयी ‘टाइम’ने केलेल्या ‘कव्हर स्टोरी’त राजेश यांची दखल घेण्यात आली होती. फेब्रुवारी २००६ मध्ये ‘न्यूजवीक’ने ‘नोवाटियम’ या राजेशच्या ‘१०० डॉलर कॉम्प्युटर प्रकल्पा’बाबत लिहिले होते.

राजेश जेव्हा ‘राजकीय उद्योजक’ बनले : या प्रश्नाने त्यांचे जीवन बदलून गेले... २००८ साली मित्राने विचारलेल्या एका प्रश्नाने राजेशचा प्रवास तंत्रज्ञान जगतापासून राजकारणापर्यंत सुरू झाला : ‘जेव्हा तुझा मुलगा मोठा होईल आणि तुला विचारेल, ‘बाबा, देशात जे काही चुकीचे होत होते, ते तू बघत होतास. तुझ्याकडे तेव्हा वेळही होता आणि पैसाही. तू काहीच कसे केले नाहीस? तर तू त्याला काय उत्तर देशील ?’ त्या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना ‘भारताला कसे समृद्ध बनवता येईल?’ या एखाद्या उद्योजकाला अभावानेच पडणाऱ्या मोठ्या प्रश्नरूपी आव्हानाला भिडण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला.

राजकारण आणि तंत्रज्ञान यांच्यात छेद जाण्याची पहिली वर्षे : ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’पासून ‘निती डिजिटल’पर्यंतची. भाजपाला समर्थन देण्यासाठी २००९ सालच्या पूर्वार्धात सुरू झालेल्या ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या राजकीय कृती गटाचे राजेश जैन सहसंस्थापक होते. २०१० साली राजेश नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा भेटले आणि २०१४ मध्ये त्यांना पंतप्रधान करण्याकरता आपल्याला काम करण्याची इच्छा त्यांनी मोदींकडे व्यक्त केली. २०११ मध्ये ‘Project 275 for 2014’ या नावाने राजेश यांनी एक ब्लॉगही लिहिला. स्वबळावर भारतीय जनता पार्टी २०१४ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळवून सत्ता कशी स्थापन करू शकते, यावर सविस्तर लिखाण केले होते. त्यानंतर मोदींच्या कॅम्पेनकरता राजेश यांनी प्रसारमाध्यमे, डेटा आणि तंत्रज्ञान या तिन्हींवर काम करणारी ‘निति डिजिटल’ची शंभर जणांची टीम करून काम सुरू केले.

२०१४ च्या निवडणुकांचा अंदाज २०११ मध्ये वर्तवला : भाजपाच्या ‘Mission 272+’ मागचे गुपित. जून २०११ मध्ये ‘Project 275 for 2014’ या विषयीचा ब्लॉग त्यांनी लिहिला. त्यात राजेश यांनी लिहिले होते, ‘केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला १७५ जागांवर नाही तर २७५ जागा (किंवा २२५+ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ३ सद्य मित्रांसमवेत ४५ जागा) जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. १७५ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याहून २७५ जागा जिंकण्यासाठी अत्यंत वेगळे धोरण आखणे गरजेचे होते. ३५० जागांपैकी २७५ जागा जिंकण्याकरता भारतीय जनता पार्टीला ७५ टक्के जागा संपादन करण्यासाठी लाट निर्माण करणे गरजेचे होते. त्याकरता भविष्यकालीन प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. राज्या-राज्यांतील निवडणुकींचा आढावा घेतल्यानंतर भाजपाच्या वाट्याला १७५ चा आकडा येत होता आणि जर काँग्रेसला १५० जागा जिंकणे शक्य बनले, तर भाजपाला सरकार स्थापन करता येणे अशक्य होते. याआधी १९८४ मधील निवडणुकीत लाट निर्माण झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत लाट निर्माण व्हावी, या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने देशभरात- प्रामुख्याने ३३०-३५० जागांवर जिथे भारतीय जनता पार्टी स्पर्धेत होती, तिथे काम करणे आवश्यक होते. २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने अधिक आघाड्या निर्माण करण्यापेक्षा अधिकाधिक जागा पटकावण्यावर भर दिला. सर्व डावपेच यांवर केंद्रित करण्यात आले होते.’ नोंद घेण्यासाठी, भारतीय जनता पार्टीने मे- २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २८२ जागा जिंकल्या.

डेटाविषयी प्रेम : Khel.com आणि IndiaVotes.com राजेश यांनी १९९७ साली Khel.com ही सर्वात पहिली क्रिकेट साइट सुरू केली. त्याखेरीज सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरू केले. थेट प्रक्षेपणाखेरीज सर्व क्रिकेट सामन्यांच्या आकडेवारीचा खजिना Khel.com वर उपलब्ध असल्याने ही वेबसाइट इतरांहून वेगळी ठरली. क्रिकेट खेळासंबंधी अंतर्दृष्टी विकसित होण्याच्या दृष्टीने, या वेबसाइटद्वारे सर्वप्रथम कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि रणजी ट्रॉफी सामन्यांचे डिजिटाइज्ड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. IndiaVotes.com सुरू करून २०१२च्या निवडणूक डेटासंबंधीही तेच केले. प्रत्येक राष्ट्रीय आणि राज्य निवडणूक डेटा डिजिटाइज्ड स्वरूपात उपलब्ध करून दिला. त्या माहिती आधारे संभाव्य परिणाम समजून घेता येणे शक्य बनले.

The journey from Niti Digital to Nayi Disha: Rajesh spent time in the past years reading, talking to people and thinking – to understand a very basic question: why are Indians not rich?
The answer was simple but non-intuitive: Indians have too much government, and too little freedom. Governments do not create prosperity; people do.Unfortunately, all governments have essentially been the same – they all focus on growing the size and scope of the government; their only difference lies in the packing and selling. In India, constraints are put on individuals while giving a free hand to governments – exactly the opposite of what is needed to make Indians prosperous.

राजेश यांचा विश्वास : मोठ्या योजना बनवा. राजेश स्वत:ला उद्योजक म्हणून पाहतात, राजकारणी म्हणून नव्हे. त्यांना तंत्रज्ञान आणि राजकारण यांत मोठे विचार करायला आवडतात. डॅनियल बर्नहॅम यांचे शब्द ते उद्धृत करतात- ‘लहानसहान योजना योजू नका. त्यांच्यात व्यक्तीचे रक्त सळसळण्याची जादू नसते. त्या कदाचित स्वत:च्याही लक्षात येणार नाहीत; मोठ्या योजना योजा. कामाचे आणि आशेचे ध्येय मोठे ठेवा.’”

राजेश यांचे पुढील उद्दिष्ट : भारतीयांना समृद्ध बनवणे.राजेश यांनी स्वत:च्या आयुष्यात काही अशक्य गोष्टी करून दाखवल्या आहेत. ‘नई दिशा’द्वारे या वेळेस, त्यांना १३० कोटी भारतीयांसाठी ते करून दाखवायचे आहे.

आपण त्याना इथे लिहू शकता rajesh@nayidisha.com.