उत्तर प्रदेश- बिहार पोटनिवडणुका (भाग 1) : तीन विजेते आणि तीन पराभूत.

भारतीय राजकारण खूपच स्वारस्यपूर्ण होत चालले आहे. मतदारांमधील असंतोष हा आता संतापात परावर्तित होत आहे. जर अलीकडच्या निवडणूक निकालांकडे पाहिले, तर सरकारमधला बदल हवेत दिसत आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहार पोटनिवडणुकांचे निकाल या प्रसारमाध्यमांतील ठळक बातम्या बनल्या. माझ्या मते, या पोटनिवडणुकांमध्ये तिघे जिंकले- मायावती, राजद आणि जात. आणि ती पराभूत झाले- नितीश, काँग्रेस आणि भाजप. अधिक महत्त्वाचे म्हणजे, यातून तीन गोष्टी शिकता येतील आणि एक धोक्याचा इशाराही आहे- ज्याचा परामर्श पुढील लेखात आणि व्हिडियोत मिळू शकतो.

तीन विजेते

मायावती –

फुलपूर अथवा गोरखपूर यांपैकी कुठल्याच उत्तर प्रदेशतील जागेवरून निवडणूक न लढता हा विजय मायावतींचा सर्वात मोठा विजय ठरला. समाजवादी पार्टीकडे मते हस्तांतरित करून त्यांनी उत्तर प्रदेश आणि पर्यायाने भारतात कोण विजय संपादन करेल, याचा हुकूमी पत्ता आपल्या हातात आहे, हे दाखवून दिले. त्यांच्या विचारात घेतल्या जाणाऱ्या मूल्यात आता आणखी एक शून्य जोडले जाईल.

राजद –

लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय, त्यांचा पक्ष पुरता फिका पडेल, असे अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. त्यांनी बिहारमधील अरारियाची लोकसभेची जागा राखली. राजद पक्षात चैतन्य सळसळतंय आणि भाजपच्या बिहारसंबंधीच्या महत्वाकांक्षांना खीळ घालण्याची संभाव्य ताकद राजदमध्ये आहे.

जातीय राजकारण –

नोकऱ्यांचा आणि आर्थिक प्रगतीचा अनुभव नसलेल्या या हिंदी भाषिक प्रदेशात जात हीच महत्त्वाची गणली जाते. २०१४ मध्ये आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या विश्वासाने पुरेसा जनादेश भाजपला देऊनही एक प्रकारे आपली फसवणूक झाल्याची भावना लोकांमध्ये बळावली आहे.

तीन पराभूत

नितीश कुमार –

जनता दल (युनायटेड) आपली मते भाजपकडे हस्तांतरित करण्यात अपयशी ठरले. भाजपमध्ये युतीबाबत पुनर्विचार होणार, हे नक्की. या पराभवाने नितीश यांनी आपली ओळख हरवली आहे आणि नेता नसलेल्या राजद पक्षात नवी शक्यता खुली केली आहे.

काँग्रेस –

उत्तर प्रदेशाच्या पोटनिवडणुका लढवण्याचे काही कारण नसलेल्या काँग्रेसलाही या निकालाचा फटका बसला आहे. भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडणे थांबवण्याकरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून बाहेर पडणे उत्तम, भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या १५० लोकसभा जागा लढण्यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित करायला हवे.

भाजप –

बातम्यांचे मथळ्यांचे व्यवस्थापन आणि वर्णनात्मकतेवर नियंत्रण हे भाजपसाठी इतके महत्त्वाचे होते की,उत्तर प्रदेशातील दोन महत्त्वपूर्ण जागा गमावल्याचे त्यांना काही देणेघेणे नव्हते. राजकारण हे धारणेविषयी असते आणि जिथे त्यांनी बहुतांश जागा पटकावल्या होत्या, तिथे त्यांच्या अजिंक्यतेचे तेज हळूहळू भंग पावत आहे.

**

यातून भाजपला तीन पाठ मिळाले आहेत- त्यांना ५० टक्के मतांचा वाटा (वोटशेअर) मिळणे आवश्यक आहे, जो मतांमध्ये फूट पाडून मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी समृद्धीकडे जाण्याचा बदल करायला हवा. नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान जे आश्वासन दिले होते, जे ते विसरले आहेत, पण मतदारांच्या ते लक्षात आहे, असा इशारा यानिमित्ताने भाजपला मिळाला आहे. पुढील लेख आणि व्हिडियोकरता संपर्कात राहा.