उत्तर प्रदेश – बिहार पोटनिवडणुका (भाग 2) : भाजपला मिळालेले तीन पाठ आणि इशारा.

मागील लेख आणि व्हिडियोमध्ये, आपण मायावती, राजद आणि जात या तीन विजेत्यांची आणि नितीश, काँग्रेस आणि भाजप या तीन पराभूतांची चर्चा केली. या लेखात, यांतून भाजपला मिळालेल्या तीन पाठांची चर्चा करू- – त्यांना ५० टक्के मतांचा वाटा आवश्यक आहे, जो मतांमध्ये फूट पाडून मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी समृद्धीकडे जाण्याचा बदल करायला हवा. नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान जे आश्वासन दिले होते, जे ते विसरले आहेत, पण मतदारांच्या ते लक्षात आहे, असा इशारा यानिमित्ताने भाजपला मिळाला आहे.

तीन पाठ

भाजपला ५० टक्के मतांचा वाटा (वोटशेअर) प्राप्त करण्याची गरज आहे…

२०१४ च्या निवडणुकीत, प्रचारमोहिमेत सहभागी झालेले आमच्यातील काही म्हणायचे की, अधिक जागा जिंकण्याकरता भाजपला उत्तर प्रदेशमध्ये ४० टक्के मतांचा वाटा ओलांडायला हवा. त्यांनी नेमके तेच साध्य केले. पण आता खेळ बदलला आहे. भाजप व्यतिरिक्त राजकीय पक्षांना अस्तित्वाच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे- युती करा नाहीतर नष्ट व्हा. २०१४ मध्ये जिंकलेल्या बहुतेक जागा लढताना एका विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा सामना करावा लागेल, असे आता भाजपने गृहित धरले आहे. मात्र, विरोधक एका ठोस पद्धतीने कार्यरत राहिले, तर पहिले गृहितक उपयोगी ठरणार नाही. याचाच अर्थ असा की, भाजपला आता बहुतांश मते- ५० टक्क्यांहून अधिक जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. भाजपने २०१४ साली २८२ जागांपैकी बरोबर अर्ध्या- १४१ जागा जिंकून नेमके हेच साध्य केले.

…जे मतांमध्ये फूट पाडून मिळणार नाही…:

५० टक्के आणि त्याहून अधिक जिंकण्यासाठी, भाजप जात, समाज अथवा वर्गनिहाय फूट पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. मागच्या निवडणुकीत जे यशस्वी ठरले, यांवरून भविष्यातही ते उपयुक्त ठरेल असे सांगता येत नाही. त्यांना केवळ आश्वासने देता येणार नाहीत. त्यांची सत्ता आहे, त्या केंद्रातील आणि राज्यांतील कामगिरीवर भाजपला जोखले जाईल. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर मत मिळत असल्याने त्यातील नाविन्यपूर्णताही निघून गेली आहे. जिंकण्यासाठी अपेक्षित असलेल्या जागांसह बहुमताचा टप्पा ओलांडण्यासाठी भाजपला धृवीकरण आणि फूट पाडणे उपयुक्त ठरणार नाही.

… समृद्धीकडे जाण्याचा बदल करण्याची गरज आहे:

भाजपला केवळ संदेशांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीद्वारेही समृद्धीकडे जाण्याचा बदल करण्याची गरज आहे. समृद्धी ही आनंद आणि विकसित राष्ट्राकरता गुरूकिल्ली आहे. समृद्धी ही गॅस सिलेंडर, विजेची जोडणी, बँक अकाऊंट, विमा योजना अथवा कर्जमाफी याबाबत नाही. समृद्धी ही लोकांना अधिक चांगल्या जीवनासाठी काय हवे आहे, ते निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याबाबत असते. समृद्धी ही संपत्ती निर्मितीस प्रतिबंध करणारा प्रत्येक अडथळा काढून टाकण्याबाबत आहे. समृद्धी ही भारतीयांना ७० वर्षे गरीब ठेवणारी यंत्रणा नष्ट करण्याबाबत आहे. समृद्धी निवडणुकीतील पक्षांच्या विविध मतांसाठीच्या जाहिरातबाजीवर हुकमी पान होऊ शकते. ते मंडल आणि मंदिरालाही मागे सारू शकते. भारताच्या भविष्यातील निवडणुका अधिकाधिक आर्थिक मुद्द्यांवर लढल्या जातील, ज्यात मतदार विचारणा करतील- ‘यात माझ्यासाठी काय आहे? ’शिक्षण, आरोग्य, कामगार, जमीन, कृषि, प्रशासकीय, पोलीस, न्याय यांत वास्तवस्वरूप आणि रचनात्मक सुधारणा घडवून या क्षेत्रांत खासगीकरण, नियंत्रणमुक्तता आणली आणि शहरांकडे अधिकार हस्तांतरित केले तर भारताचा कायापालट होईल आणि भारतीय समृद्ध होतील. लोकसभेत बहुमत असल्याने नरेंद्र मोदींच्या भाजपला अजूनही सत्तेच्या उर्वरित काळात हे करता येईल. पहिला इशारा

लोकांशी बोला आणि त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळच्या नरेंद्र मोदींच्या एका विशिष्ट आश्वासनाबाबत विचारा आणि तुम्हाला अपरिहार्यपणे उत्तर मिळेल- ‘प्रत्येक गरीब कुटुंबाला १५ लाख रुपये.’ त्यांच्यासाठी हे आश्वासन म्हणजे कामगिरी, समृद्धी, अच्छे दिन, विकास, अधिक चांगले भविष्य होते. कुठलेही मायाजाल अथवा जुमल्याचे वक्तव्य कामगिरीचा अभाव लपवू शकत नाही.

लोकांसाठी, १५ लाख रुपयांचे आश्वासन ही युक्ती नव्हती. स्वातंत्र्य, निवड आणि कल्याणाच्या नव्या जीवनाकडे घेऊन जाणारा तो पासपोर्ट होता. ते कधीही घडले नाही. अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये हा इशारा मतदार वारंवार देत आहेत.

**

चालू कार्यकालात नरेंद्र मोदींनी एका गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं, ते म्हणजे भारतीयांना दिलेले १५ लाख रुपयांचे आश्वासन आपण कसे पूर्ण करू शकू? यांवर लक्ष केंद्रित करून आणि एका उद्योजकासारखे राजकीय स्टार्टअपचे प्रमुख म्हणून काम करत, त्यांना वेगवेगळ्या सुधारणा लागू करत भारताच्या समृद्धीविरोधी यंत्रणेचा चक्काचूर करणे शक्य होईल. जर नरेंद्र मोदींनी ते केले नाही तर आपण एकत्र येऊन त्यांना हे करणे भाग पाडायला हवे.

हे करता येईल आणि पुढील आठवड्यापासून मी तुम्ही, मोदी आणि भारताचा पहिला समृद्ध पंतप्रधान बनू इच्छिणाऱ्यांसमोर स्पष्ट करतो की, १५ लाख रुपयांचे आश्वासन कशा पद्धतीने राखता येईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनात परिवर्तन कसे येऊ शकेल?