नई दिशा’ नेमके काय आहे? त्यामागे नेमक्या कोण व्यक्ती आहेत? तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे?

‘नई दिशा’ हा भारतीयांना समृद्ध बनविण्याकरता निर्माण केलेले स्वतंत्र राजकीय व्यासपीठ आहे. आपल्या देशाच्या कार्यपद्धतीत मूलगामी बदल घडविण्यासाठी भारतीयांना एकत्र आणणे, हे ‘नई दिशा’चे उद्दिष्ट आहे. आपले हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि अब्जाहून अधिक नागरिकांना उत्तम भविष्य देण्याकरता भारतात राजकीय आणि आर्थिक क्रांती घडण्याची नितांत आवश्यकता आहे, असे ‘नई दिशा’ला वाटते. कृपया आमचा जाहीरनामा आणि प्रयोजनाचे नियोजन अवश्य वाचा. जाहीरनामा आणि उद्देशाचे विवरण.

नई दिशा हे अशा तऱ्हेचे राजकारणातील पहिले व्यासपीठ आहे. जर तुमच्या देशाकरता, मतदारसंघाकरता काही कल्पना- योजना असतील, तुमच्या देशाच्या समृद्धीच्या कथेत आपण काय योगदान देऊ शकतो, असा अचंबा तुम्हाला वाटला असेल तर हे तुमचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. येथे.

तुम्हाला आम्ही राजकारणातील उबर/ओला किंवा झोमॅटो वाटू. आमचे स्वत:चे असे उमेदवार नाहीत किंवा आम्ही एक राजकीय पक्षही नाही. आम्ही म्हणजे डिजिटलरीत्या सबळ असे व्यासपीठ आहोत, ज्याद्वारे भारताला नव्या दिशेने नेण्याची संधी स्थानिक स्तरावरील नेत्यांना प्राप्त होईल.

नई दिशा’ हे व्यासपीठ राजेश जैन, तंत्रज्ञान उद्योजक आणि आशियाच्या डॉटकॉम क्रांतीचे अग्रणी असलेल्या यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. विद्यार्थी, उद्योजक, वकील, अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील आणि विविध वयोगटातील नागरिक आमचे सदस्य आहेत.

तुम्हाला अधिक प्रश्न असतील, तर आमच्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न या विभागाला भेट द्या.)

नई दिशा चे उद्दिष्ट आणि मोहीम काय आहे

गरिबी हे भारताचे प्राक्तन नव्हे, यांवर ‘नई दिशा’ला विश्वास आहे. भारतीयांसाठी समृद्धी आणावी आणि तीही शतकानंतर नव्हे, तर दोन निवडणुकांच्या दरम्यान आणावी, हे आमचे ध्येय आहे.

समृद्धी हवी असणाऱ्या मतदारांना आणि ज्यांना अशी समृद्धी नागरिकांना पोहोचती करायची आहे, अशा उमेदवारांना एकत्र आणणे, हे आमच्या ‘मोहीम ५४३’चे ध्येय आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अशा जोशपूर्ण स्थानिक नेत्यांना उमेदवारी देऊन ५४३ जागा बहुमताने जिंकाव्यात, पुढील सरकार स्थापन करावे आणि कधीही न संपणाऱ्या समृद्धीच्या वाटेवर भारतीयांना पोहोचवण्याचा अजेंडा राबवावा, अशी आमची योजना आहे.

पुढील तत्त्वे आमची मार्गदर्शक आहेत:
1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण
6. वेळेवर न्याय
7. सार्वजनिक संपत्ती सुपूर्द करणे

आमच्या व्यासपीठाविषयी आणि जाहीरनाम्याविषयी अधिक वाचा.

सर्व भारतीय संपन्न, समृद्ध व्हावे, याकरता ‘नई दिशा’चा काय प्रस्ताव आहे?

‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.

लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...

अधिक माहितीसाठी वाचा

‘नई दिशा’ची संस्थात्मक रचना कशी आहे?

विवेकी, विचारांशी बांधील असणारे आणि ज्यांना भारतातील राजकारणात आमूलाग्र बदल आणायचा आहे, अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी ‘नई दिशा’ची टीम बनली आहे. जर तुम्हाला ‘नई दिशा’च्या ध्येयावर विश्वास असेल तर भारत समृद्ध बनविण्यासाठी आमच्यासोबत काम करा.

आमच्या ध्येयाचा एक भाग बना, ‘नई दिशा’त दाखल व्हा

नई दिशा’ समृद्धीचे आश्वासन देत आहे. तुम्हाला वाटते का, की प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये वाटल्याने भारतीय नागरिक श्रीमंत होतील?

३० कोटींहून अधिक भारतीय अत्यंत गरिबीत राहात आहेत. भारतीय कुटुंबाचे साधारण उत्पन्न हे प्रतिवर्षी केवळ १.२ लाख रुपये आहे. जर प्रत्येक भारतीय कुटुंबाकडे एक लाख रुपये सुपूर्द केले तर एकूण भारतीय कुटुंबांपैकी अर्ध्याहून अधिक कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट होईल. बहुतांश भारतीयांसाठी ही रक्कम मोठी आहे आणि त्यांचे जिणे आमूलाग्र बदलण्यासाठी हा पैसा त्यांच्या कामी येईल.

त्याचबरोबर, ‘नई दिशा’च्या इतर सुधारणांमुळे नव्या नोकऱ्यांची निर्मिती होईल, तसेच लहान आणि मोठ्या उद्योजकांसाठी व्यापार करणे अधिक सुकर होईल.

तुमची आश्वासने ही देखील निवडणुका ‘जुमला’ वाटत आहे- या वेळेस मोदींकडून नाही तर ‘नई दिशा’कडून केला गेलेला ‘जुमला’. मी त्यावर का विश्वास ठेवू?

हा ‘जुमला’ नाही. सार्वजनिक संपत्तीचे खरोखरच मालक असलेल्या भारतीयांना संपत्ती सुपूर्द करण्याचे आश्वासन ‘नई दिशा’ने दिले आहे. ही संपत्ती सरकारतर्फे आजमितीस वापरली गेलेली नाही अथवा त्याचा गैरवापर होत आहे. राजेश जैन हे एक यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांनी देश समृद्ध होण्याकरता त्यांचे स्रोत आणि वेळ या चळवळीत गुंतवला आहे. ‘नई दिशा’च्या टीमने या विषयासंबंधित बरेच संशोधन केले आणि आणि सार्वजनिक संपत्तीचे चलनीकरण करण्यासंबंधी आणि ते जनतेला सुपूर्द करण्यासंबंधी सविस्तर योजना बनवली आहे. आमच्याकडून फुकाफुकीची, हवेतील आश्वासने दिली जात नाहीत.

‘नई दिशा’ सुरू करण्यामागील आमच्या प्रेरणेविषयी... अधिक वाचा.

जमीन आणि खनिज संपत्ती कोण विकत घेईल? राज्य सरकारकडून जमीन विनामूल्य मिळत असताना ते लिलावात का सहभागी होतील? परदेशी नागरिकांनाही त्यात सहभागी होता येईल का?

प्रारंभी, कोणतेही राज्य सरकार जमिनीसारखा मौल्यवान स्रोत उद्योगांना विनामूल्य देणार नाही. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीचे मालक नागरिक आहेत आणि जर उद्योगांना ती राज्य सरकारांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातील आपला योग्य वाटा सरकार आपल्यापासून हिरावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, कायद्याच्या राज्याच्या अभावी आणि नियमांच्या ओझ्यामुळे आज भारताच्या सार्वजनिक साधनसंपत्तीची खरेदी करण्यास कुणीही तयार नाही. जर लोकांकडे पैसा येईल आणि उद्योग करणे सोपे बनेल तेव्हा व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्रोतांची मागणी वाढेल.

भारतात संपत्ती खरेदी करण्याबाबत भारतीयांसारखेच परदेशी नागरिकांना आणि कंपन्यांनाही समान वागणूक मिळेल. भारतीय लोकांना अधिकाधिक पैसा मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काही स्रोतांबाबत अपवाद केला जाईल.

जर नजिकच्या भविष्यकाळात सार्वजनिक संपत्ती संपुष्टात आली तर... काय होईल?

आधी नमूद केल्यानुसार, प्रत्येक भारतील कुंटुंबाला वर्षाला एक लाख रुपये ५० वर्षे वितरित करता येतील, इतकी भारताची सार्वजनिक संपत्ती आहे. ही संपत्ती मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला कल्याणकारी उपक्रमांची अथवा कुठल्याही स्वरूपात पुनर्वितरण करायची गरज भासणार नाही. याचे कारण भारतीय तोपर्यंत त्यांचे भाग्य स्वत: लिहिण्याकरता भारतीय नागरिक श्रीमंत आणि समृद्ध बनत असतील.

गरिबांसाठी ‘नई दिशा’ काय करेल? त्यांच्यासाठी नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार नाही का?

‘नई दिशा’ प्रतिवर्षी प्रत्येक भारतीय कुटुंबाला एक लाख रुपये सुपूर्द करणार आहे. यामुळे गरिबांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक संधी वाढून मूलभूत सुधारणा होतील. यांमुळे संधींचा अभाव, सामाजिक आणि आर्थिक भांडवलाचा अभाव यांमुळे अनेक भारतीय जे गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत, त्यांच्या गरिबीचे दुष्टचक्र भेदता येणे शक्य होईल.

सार्वजनिक संपत्तीची नागरिकांना सुपूर्द करण्यासोबत भारतीय युवावर्गाला लक्षावधी नोकऱ्यांची आवश्यकता आहे, हेही ‘नई दिशा’ने ओळखले आहे. उद्योगांना पूरक वातावरण निर्मिती असल्याशिवाय तसेच उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल असल्याशिवाय नव्या नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकत नाही. ‘नई दिशा’ला अर्थव्यवस्था अधिक मुक्त करायची आहे, जेणे करून लोकांना उद्योग सुरू करणे आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणे शक्य होईल. त्याचबरोबर, नागरिक हा पैसा रोजगार कौशल्य अथवा शिक्षणाकरता उपयोगात आणू शकतात, ज्यामुळे चांगली नोकरी मिळू शकते.

अधिक माहितीसाठी वाचा

११. ‘नई दिशा’ या राजकीय पक्षाची नोंदणी भारताच्या निवडणूक आयोगाकडे झाली आहे का? जर नसेल, तर या व्यासपीठाचे पक्षात रूपांतर कसे आणि कधी होईल?

नाही, ‘नई दिशा’ हा नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. प्रशासन आणि राजकारणाचे उत्तम प्रारूप शक्य होण्याकरता स्थापन झालेले हे व्यासपीठ आहे. व्यासपीठ म्हणून आमचा भर भारतीयांना समृद्ध करणे हे सामायिक उद्दिष्ट असलेल्या व्यक्तींना एकत्र आणणे हा आहे. राजकीय पक्ष नसल्याने ‘नई दिशा’चे सामायिक चिन्ह फक्त असणार नाही.

आमच्या दृष्टीकोनाचा एक भाग व्हा

‘नई दिशा’ व्यासपीठाकरता मी काय करू शकतो?

‘नई दिशा’ व्यासपीठाद्वारे तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील:

a. सर्व स्तरांवरील अंतर्गत निवडणुका लढवता येतील आणि उमेदवारांसाठी मतदान करता येईल.
नेते आणि उमेदवार यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करता येईल.
c. तुमचा दृष्टिकोन मांडता येईल आणि महत्त्वाच्या धोरणांची चर्चा करता येईल.
d. तुमच्या विभागातील ‘नई दिशा’च्या इतर सदस्यांची माहिती करून घेता येईल आणि त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
कार्यकर्ता म्हणून आणि गटप्रमुख म्हणून, तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करता येईल :

 • नव्या सदस्यांची नोंदणी करणे, ‘नई दिशा’विषयी अधिकाधिक लोकांना सांगणे.
 • स्थानिक स्तरावरील बैठकांचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे.
 • दारोदार फिरून सर्वेक्षण करणे.
 • नव्या मतदारांची नोंदणी करणे.
 • सार्वजनिक संपत्तीच्या माहितीत भर घालणे.
 • निधी उभारणी
 • स्थानिक स्तरावर विविध मोहिमा हाती घेणे.
 • निवडणुका नजिक आल्यानंतर मतदार नक्की मतदानाला जातील, याची काळजी घेणे.
 • व्यासपीठा विषयी अधिक वाचा.

  ‘नई दिशा’च्या अंतर्गत निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळण्याकरता किमान वयोमर्यादा आहे का?

  होय नई दिशा चे सदस्य बूथ आणि ब्लॉक-लेव्हलमध्ये प्रामुख्याने स्पर्धा करू शकतात जर ते किमान 18 वर्षांचे असतील विधानसभा आणि संसदीय मतदारसंघाच्या पातळीवर, घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार 25 किमान वय असेल

  अंतर्गत निवडणुकांविषयी अधिक वाचा

  तुम्ही भाजपा/काँग्रेस/आप या पक्षांचा भाग आहात का की केवळ मत विभागणी करण्यासाठी तुम्ही अस्तित्वात आला आहात? आवश्यकता भासली, तर भविष्यात तुम्ही यांतील एखाद्या महत्त्वाच्या पक्षात प्रवेश करणार आहात का?

  नाही, ‘नई दिशा’ कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. जे देशातील सद्य राजकीय स्थितीला कंटाळले आहेत, अशा दूरदृष्टीचा विचार करणाऱ्या भारतीयांसाठीचे हे नवे आणि स्वतंत्र व्यासपीठ आहे. आम्ही खुले आणि लोकशाहीवादी राजकीय व्यासपीठच राहू. आमची ताकद ही राजकीय आघाडीतून नाही तर आमच्या सदस्यांतून, आमच्या उमेदवारांतून, नव्या विचारांतून आणि तंत्रज्ञानातून एकवटेल.

  जर तुम्ही सद्य राजकीय चित्राबाबत खूश नसाल, तर आमच्यात सहभागी व्हा.

  तुम्ही केवळ एक व्यासपीठ आहात, मी केवळ एक मतदार आहे. आपण बदल घडवू शकाल का? ज्यांनी कुणाला मत द्यायचे निश्चित केलेले नाही आणि जे मतदान करत नाहीत, त्यांना एकत्र आणण्याकरता ‘नई दिशा’ची कोणती योजना आहे?

  एका मताने काय फरक पडणार, असा विचार तुमच्यासारखेच लक्षावधी लोक करतात. मात्र, देशाचे सरकार कित्येकदा एक तृतीयांश बहुमताने निर्माण झाले आहे.

  २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, ८३.७ कोटी अर्हताप्राप्त मतदारांपैकी २८.७ कोटी मतदारांनी मत दिले नव्हते. विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीला १७ कोटी मते मिळाली. जर २८.७ कोटी नागरिकांनी मतदान केले असते, तर निवडणुकीचा निकाल वेगळा असता.

  बरेच नागरिक मतदान करत नाहीत, कारण ते विचार करतात, त्यांच्या एका मताने निकालात काय फरक पडणार? मात्र, आकडेवारी सांगते की, हे खरे नाही. जर सर्वांनी एकत्र येऊन मतदान केले, तर मतलबी राजकारण्यांचा धुव्वा उडवून, देशाला खरोखरीच मुक्त करून प्रगतिपथावर नेणे शक्य आहे..

  आम्हाला विश्वास आहे, की आपल्यातील अनेकांमध्ये नेतृत्वक्षमता आहे. आपल्याला आपल्या भोवतालच्या वातावरणात बदल घडावा, असे वाटत असते, मात्र बहुतांश वेळा तो कसा घडवावा, हे माहीत नसते. ‘नई दिशा’ हे एक खुले व्यासपीठ आहे, ज्यात प्रत्येक स्तरावर प्रेरित व्यक्तींना एकत्र येता येईल.

  तुम्हाला कधी वाटलंय का, की एखादा आवाज काहीही बदल घडवू शकत नाही अथवा तुम्ही केलेल्या निवडीनंतरही धोरण अथवा अंतिम परिणाम बदलत नाही किंवा घाणेरड्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या राजकारणामुळे तुम्ही राजकारणापासून दूर राहता का? देशाच्या राजकारणात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी ‘नई दिशा’ने तुमच्यासाठी राजकारणाचे आणि प्रशासनाचे एक नव्या पद्धतीचे प्रारूप आणले आहे..

  या बदलात तुम्ही सहभागी होऊ शकता. ‘नई दिशा’त सहभागी व्हा.

  जर तुम्ही तळापासून उमेदवार निवडीला सुरुवात करत आहात, तर तुम्ही स्थानिक समस्यांनाही हात घालणार आहात का?

  ‘नई दिशा’ हे एक खुले व्यासपीठ आहे, जे सदस्यांचे सबलीकरण करते. या व्यासपीठाचा पारंपरिक श्रेणीपेक्षा नेटवर्कच्या शक्तीवर विश्वास आहे. या व्यासपीठाचा उपयोग करून सदस्य एकत्र येऊ शकतील आणि स्थानिक समस्या सोडवू शकतील. ते बैठकांसाठी, कार्यक्रमांसाठी आणि ‘धोरण मंच’ स्थापन करण्याकरता एकत्र येऊन स्थानिक अथवा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडू शकतात. ‘नई दिशा’ सत्तेचे हस्तांतरण आणि स्थानिक समाजाला निर्णयक्षमता प्रदान करण्यास पुढाकार घेत आहे.

  या व्यासपीठाविषयीच्या अधिक माहितीसाठी वाचा

  लोक ईव्हीएम- मतदान यंत्रांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत आणि पुन्हा कागदी पत्रिकाचा अवलंब करावा, असे त्यांना वाटतेय. मी तुमच्या व्यासपीठावर का विश्वास ठेवू? तुमच्या कामांकरता निधी उपलब्ध करून देतील, अशा तुमच्या काही ‘खास’ उमेदवारांना पाठिंबा देण्याकरता तुम्ही हा सारा खटाटोप करत असाल

  भारतीय राजकारणाचा पारंपरिक मार्ग बदलण्यासाठी ‘नई दिशा’ प्रयत्नशील आहे आणि त्यांच्या मुख्य उद्दिष्टाला धोका निर्माण होईल, अशी कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत. त्याचबरोबर, वापरणाऱ्या सर्वांना सिस्टीमद्वारे ओळख पटवली जाते आणि ती व्यवस्थित चालावी आणि त्यात एकात्मता राखावी, याची तजवीज करण्यात आली आहे.

  गेल्या ७० वर्षांत जे कुणी करू शकले नाही, ती आश्वासने तुम्ही पूर्ण करू शकाल, असे तुम्हाला कसे वाटते? दर्जेदार शिक्षणाचा, आरोग्य सुविधांचा आणि कायद्याच्या राज्याचा अभाव- अशा मूलभूत समस्या ‘नई दिशा’ कशा सोडविणार?

  राजकीय पक्षांना आणि सत्ताधारी नेत्यांना भारताची दिशा बदलण्याची काहीही प्रेरणा नाही आणि याच कारणामुळे भारत गरिबीच्या आणि पिळवणुकीच्या ब्रिटिशांपासून चालत आलेल्या मार्गावर आजही वाटचाल करत आहे. त्यांना केवळ सत्तेत राहण्यात रस आहे आणि म्हणून सरकार ज्या सवलती देईल, त्यावर भारतीयांना अवलंबित ठेवण्यात त्यांना स्वारस्य आहे, कारण यांतूनच त्यांना मते मिळू शकतील. ‘नई दिशा’ त्यांची समृद्धीची तत्त्वे उपयोगात आणणार आहे, जी आजपर्यंत देशाला समृद्ध करण्याचे आश्वासन देणाऱ्या कोणत्याही सरकारने वापरून पाहिलेली नाहीत. ‘नई दिशा’च्या समर्थकासाठी अथवा नेत्याकरता, सत्ता हे केवळ साधन आहे, ध्येय नव्हे.

  ‘नई दिशा’ समृद्धीची अशी तत्त्वे उपयोगात आणणार आहे, जी कोणत्याही सरकारने नागरिकांना समृद्ध करण्याकरता यापूर्वी वापरलेली नाहीत. ‘नई दिशा’च्या समर्थकांसाठी अथवा नेत्याकरता, सत्ता हे केवळ साधन आहे, ध्येय नाही.

  कायद्याचे राज्य मजबूत करण्यासाठी आणि देशाचे प्रशासन नीट चालावे याकरता साधेसोपे नियम असावेत, ही ‘नई दिशा’ची योजना आहे. शाळा सुरू करणे आणि आरोग्याच्या सुविधा पुरवणे यांसारखी सरकारच्या माथी असलेल्या अपेक्षा कमी करण्याचीही ‘नई दिशा’ची योजना आहे. अधिक व्यक्तींना सेवा उपलब्ध करू देण्यास मुभा देऊन आणि सार्वजनिक संपत्ती नागरिकांना सुपूर्द करून लोकांच्या हातात अतिरिक्त पैसा ठेवल्याने प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळू शकतील.

  आमच्या उद्दिष्टाबाबत अधिक वाचा

  जर विरोधी राजकीय पक्षातील गुंडांनी तुमच्या उमेदवारांना धमकावले तर तुम्ही तुमच्या उमेदवारांचे रक्षण कसे कराल?

  जनता ज्या चळवळीचे नेतृत्व करते, त्यावेळेस आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून आपल्याला प्रतिकार होण्याचा धोका आहे;मात्र जर आपल्याला समृद्ध भारतात राहावयाचे असेल, तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपण हा धोका पत्करायला हवा. भारतातील अनेक राजकीय चळवळी विवेकी, वचनबद्ध अशा काही व्यक्तींच्या एका लहान गटापासून सुरू झाल्या. तेव्हा जर सारेजण भीतीत जगले असते, तर आजही आपल्यावर परकीयांची सत्ता असती.

  ‘नई दिशा’ निधी उभारणी कशी करेल?

  राजेश जैन यांनी नई दिशाचा प्रारंभिक निधी दिला आहे. अधिक निधीसाठी, लवकरच जे योगदान देऊ इच्छितात ते सर्व देऊ शकतील त्या सर्वांसाठी आम्ही लवकरच हे पारदर्शक पद्धतीने सुरु केले जाईल.

  ‘नई दिशा’ मध्ये सहभागी होऊन तुम्हीही आम्हाला मदत करू शकाल.

  ‘नई दिशा’मध्ये कोणकोणत्या व्यक्ती सहभागी आहेत? त्यांच्या कर्तृत्वाविषयी?

  ‘नई दिशा’ सुरू करण्यात राजेश जैन यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी, उद्योजक, वकील, अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक अशा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभागी झाल्या आहेत. ही चळवळ वृद्धिंगत होण्याकरता विविध नेते, गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांची गरज आहे. समृद्धीच्या मार्गावर भारतीयांना नेण्याकरता नेतृत्त्व करणाऱ्यांची आम्हाला आवश्यकता आहे.

  राजेश जैन, संस्थापक यांच्याविषयी अधिक माहितीसाठी वाचा

  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजेश जैन यांनी मोदींना विजयी केले होते, नाही का? तर मग आता ते हे सर्व का करत आहेत? ते उद्योजक आहेत; हे व्यासपीठ त्यांच्या व्यापाराला मदत करण्याकरता निर्माण झालेले नाही, हे मी कसे मानू?

  हो, त्यांनी केले होते. २०१४ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर ७० वर्षांच्या चुकीच्या सरकारी धोरणांमध्ये नवे सरकार मूलगामी बदल करेल आणि भारताला समृद्धीच्या मार्गावर नेईल, अशी एक अपेक्षा होती. मात्र, नव्या सरकारने जुन्या धोरणाअंतर्गतच अनेक उपक्रम योजले आणि नव्या सरकारच्या अधिपत्याखाली भारत गरीब राष्ट्रच राहिले. सर्व राजकीय पक्ष एकसमान आहेत आणि लोकांच्या उत्थानाचे कोणतेही उपाय त्यांच्यापाशी नाहीत, हे राजेश यांच्या लक्षात आले. नव्या राज्यकर्त्यांपेक्षाही, आम्हाला देशाचे प्रशासन करणाऱ्या नियमांमध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आहे. त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये, राजेश यांनी शक्य तितकी एकात्मता दाखवली आहे आणि त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. मेहनतीवर विश्वास असणारे ते एक स्वनिर्मित व्यक्ती आहेत.

  उद्योग वृद्धिंगत होण्याकरता भारताला समृद्ध होण्याची आणि लक्षावधी भारतीय युवकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे, हे राजेश जाणतात. ‘नई दिशा’द्वारे, उद्योजक म्हणून त्यांचा प्रवास सुरू राहणार आहे, मात्र दुसऱ्या पद्धतीने- राष्ट्रबांधणीद्वारे. भारतात परिवर्तन होणे आवश्यक आहे आणि या क्रांतीत आपल्यापैकी प्रत्येक जणाने राजकीय उद्योजकाची भूमिका निभावायला हवी, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

  भारतीय समृद्ध बनवण्यासाठी आणि लाखो भारतीय युवकांनसाठी नोकऱ्या तयार करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे हे राजेश ह्यांना माहित आहे . उद्योजक म्हणूनचा त्यांचा प्रवास पुढेही चालू राहील , परंतु आता एका वेगळ्या क्षेत्रात- राष्ट्र उभारणीत ते आहे. भारताला परिवर्तन करण्याची गरज आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे

  ‘नई दिशा’ सुरू करण्यामागील राजेश यांच्या प्रेरणेविषयी वाचा

  राजेश जैन निवडणुकीत उभे राहणार आहेत का आणि पंतप्रधान बनणार आहेत का?

  राजेश यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, जर ते निवडणुकीला उभे राहिले तर ‘नई दिशा’चे नियम त्यांना लागू होतील- ज्या अंतर्गत सर्व स्तरांवरील सरकारमध्ये सहभागी होण्याकरता निवडणूक लढायची असल्यास अंतर्गत निवडणुकीत उमेदवाराने जिंकणे अत्यावश्यक आहे.

  अधिक माहितीसाठी, राजेश यांचा ‘प्रयोजनाचे नियोजन’ हा लेख वाचा.

  मी ‘नई दिशा’त का सहभागी होऊ?

  गरिबी हे आपले विधिलिखित नाही, यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भारताला समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे यावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ‘नई दिशा’त सहभागी व्हायला हवे.

  जर तुम्हाला आमच्या समृद्धीविषयीच्या तत्त्वांवर विश्वास असेल आणि जर तुम्ही या बदलाचा भाग होऊ इच्छित असाल तर ‘नई दिशा’मध्ये सहभागी व्हा.

  आमच्या दृष्टिकोनचा एक भाग व्हा. स्वयंसेवक व्हा

  मी नई दिशात कसा योगदान करू शकतो?नई दिशा सभासदांची भूमिका काय असेल?

  तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकता:

 • जर तुम्हांला आपल्या देशाच्या सद्य राजकारणामुळे त्रास होत असेल अथवा तुम्ही या परिस्थितीला कंटाळले असाल आणि तुम्हाला ‘नई दिशा’ कशा प्रकारे बदल घडवून आणू शकेल हे समजून घ्यायचे असेल तर आमच्या ई-मेलसाठी अथवा मोबाइल अपडेट्ससाठी साइन-अप करा.
 • जर तुम्हाला आमच्या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर तुमच्या मतदार ओळखपत्रासह नोंदणी करा आणि सक्रिय सदस्य बना.
 • तुम्ही आमच्यासह नव्या दिशेकडे चालण्यास प्रेरित असाल तर आमचे कार्यकर्ता बना आणि आमच्या संदेशांचा प्रसार करा अथवा आमचे कम्युनिटी लीडर बना.
 • नई दिशा भारताच्या भविष्याचे आर्किटेक्ट आहेत. सर्व स्तरांवर आमचे सदस्य निर्णय घेतील आणि संस्थेमध्ये सहभागी होतील

  जर तुम्हाला आमच्या ध्येयावर विश्वास असेल तर ‘नई दिशा’त सहभागी व्हा.

  नोंदणीकरता मतदार ओळखपत्राची गरज का आहे? माझी व्यक्तिगत माहिती (मतदार ओळखपत्र, दूरध्वनी क्रमांक इत्यादी) सुरक्षित कशी राहील?

  प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.

  तुमची माहिती आमच्यापाशी अत्यंत सुरक्षित आहे. अत्यंत सुरक्षित वातावरणात ती ठेवली जात आहे. तुमची गोपनीय माहिती आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि या माहितीचा अजिबात गैरवापर केला जाणार नाही, याची हमी आम्ही देतो..

  व्यासपीठाबद्दल अधिक जाणून घ्या.

  आता नई दिशात सामील व्हा

  मला ‘नई दिशा’त सहभागी होण्यात स्वारस्य आहे, मात्र मला मतदार ओळखपत्र शेअर करायचे नाही; तरीही मी ‘नई दिशा’मध्ये सहभागी होऊ शकतो का?

  हो, आपण ‘नई दिशा’त सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला मतदार ओळखपत्रासह सदस्य म्हणून ‘नई दिशा’त सहभागी व्हायचे नसेल तर तुम्ही ‘नई दिशा’ला वेगवेगळ्या मार्गांनी पाठिंबा देऊ शकता. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

 • सोशल मिडियावर आमचे अनुसरण करा आणि कुटुंबीय आणि मित्रमंडळीं मध्ये नई दिशाबद्दल माहिती पसरवा आणि चळवळ वाढवा
 • नई दिशा कार्यक्रम आणि बैठका येथे स्वयंसेवक किंवा स्थानिक अध्यायात मदत करतील
 • ‘नई दिशा’ला मदत करताना तुम्ही गुणही कमावू शकता. उदा. अंतर्गत निवडणुकीत मत देता येणे अथवा कोणत्याही स्तरावर उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहणे यांसारखे- सदस्य म्हणून लाभ संपादन करण्यासाठी तुमचे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्रासह साइन-अप केले की, तुमचे अँक्टिव्हिटीचे गुण तुमच्या अपग्रेड केलेल्या प्रोफाइलमध्ये स्थलांतरित केले जातील.

  आमच्या ध्येयाचा भाग बना. ‘नई दिशा’चे सदस्य बना.

  नई दिशा आपल्या सदस्यांबरोबर कशी सहभागी होईल?

  ‘नई दिशा’ अँप, ब्लॉग, फोरम आणि फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप आदी विविध सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या डिजिटल व्यासपीठांद्वारे आपल्या सदस्यांशी संपर्कात राहील आणि त्यांना पाठिंबा देईल. ‘नई दिशा’चा पाठिंबा जसजसा वाढेल, तसतसे आमचे स्थानिक अध्याय कार्यरत होतील, ज्याद्वारे नियमित बैठका आणि उपक्रम आयोजित केले जातील.

  ‘नई दिशा’च्या टीममध्ये सहभागी व्हा

  अधिक शंका आहेत ? आम्हाला विचारा

  आपल्या चौकशीबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच आपल्याकडे परत येऊ.

  ‘नई दिशा’च्या संपर्कात राहा.