निवड करण्याकरता आपण स्वतंत्र असायला हवे

१९४७ मध्ये भारताची जी लोकसंख्या होती, त्या संख्येहून अधिक गरीब लोक आज भारतात आहेत. गरिबी हटावसारखे कार्यक्रम ७० वर्षांहून अधिक काळ अयशस्वीरीत्या राबवूनही राजकारणी या चुकीच्या उपक्रमांनाच प्रतिसाद देत आले आहेत. नेते आणि त्यांच्या घोषणा बदलतात, मात्र गरिबांचे जिणे बदलत नाही. मलमपट्टी करणारे उपाय लोकांच्या कल्याणाकरता यशस्वी ठरत नाहीत आणि ठरणारही नाहीत. मात्र, ते राजकारण्यांवर फारच चपखलरीत्या उपयुक्त ठरतात.

गरीब हे केवळ वोट बँक बनले आहेत, ज्यांना सतत आश्वासने दिली जातात. त्यांना लवकरात लवकर गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्याकरता राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मूलभूत बदल घडवण्याऐवजी नको त्या योजनांचा मारा केला जातो. सरकारी धोरणे आणि सरकारचा हस्तक्षेप यांची रचनाच मुळी अशा प्रकारची असते, जेणे करून त्यांना शहराकडे स्थलांतर करून, नोकरी मिळवून आपले जिणे अधिक चांगले करायला उत्तेजन देण्याऐवजी गरीब लोक गावात आणि शेतीत गुरफटून राहतात. हा पीपीपी (perpetually planned poverty) – ‘कायमस्वरूपी नियोजनबद्ध गरिबीचाच नवा प्रकार आहे.

आपल्या सर्वांना कोणत्याही बळाचा वापर न करता पर्याय निवडण्याची मोकळीक असायला हवी. आपले उमेदवार, सबल महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. आपण जे पैसे कमावतो, ते कसे खर्च करायचे ते ठरवण्याची मुभा आपल्याला असायला हवी.

अशा प्रकारच्या क्रांतीची भारताला गरज आहे- जी क्रांती याआधीच होण्याची आवश्यकता होती. हे स्थित्यंतर घडण्याची गरज आहे. बळ आणि संपत्ती योग्य प्रकारे लोकांना परत करायला हवी. हा १८५७ आणि १९४२ चा न संपलेला लढा आहे.

सत्तेत असलेले सत्ताधारी ताकदवान असताना त्यांच्यापुढे एक व्यक्ती काय करू शकते, असा विस्मय आपल्याला वाटू शकेल. मात्र, जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्यातील दोन-तृतीयांश व्यक्तींच्या निष्ठा कुठल्याही पक्षाशी बांधलेल्या नाहीत. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला समर्थन असलेल्या लोकांपेक्षा ही संख्या चारपट अधिक आहे. विभाजित करणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण आपल्याला संघटित करणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करायला हवे. जर आपण सामायिक व्यासपीठावर एकत्र आलो, तर सद्य राजकीय वर्चस्वाला शह देत आपली सामूहिक शक्ती सर्वोत्तम निवड करू शकेल. सार्वजनिक संपत्तीतील आपला योग्य वाटा परत मिळाल्याने आणि कर कमी झाल्याने आपण कष्ट करून मिळवलेला पैसा आपल्यापाशी टिकून राहील आणि भविष्याचा आपण आखलेला मार्ग आपल्यापैकी प्रत्येकाला अनुसरता येईल. गेल्या ७० वर्षांत जे नुकसान झाले आहे, त्यातून बाहेर पडण्याकरता एका पिढीची मेहनत आवश्यक आहे. त्यामुळेच समृद्धीची ही क्रांती घडविण्यासाठी आता आणखी विलंब करून उपयोगाचे नाही.