आपल्यातील ऊर्जेला मुक्त करा

आपल्यातील प्रत्येकाची एक कथा असते- आपल्या आत खदखदणाऱ्या संतापाची, आपल्यातील आशेची आणि आपल्यात दडलेल्या उद्योजकाची अशी ती गोष्ट असते. आपली गोष्ट ही आपल्या अनुभवांच्या आधारे आणि आपण जे पर्याय स्वीकारतो त्यातून निर्मिलेली असते. जेव्हा आपले निवडीचे स्वातंत्र्य आकुंचित होते- जसे भारतात झाले आहे, तेव्हा आपली ही गोष्ट मुकी होते. जर माझ्या वडिलांना परदेशी शिक्षणासाठी जाण्याकरता शिष्यवृत्ती मिळाली नसती तर त्यांची कथा (आणि त्यांच्यासोबत माझी कथा) वेगळी असती.

आपल्यापैकी प्रत्येकात अद्भुत ऊर्जा दडलेली आहे, जी मुक्त होण्याची वाट बघत आहे. जेव्हा संधी मर्यादित असतात, तेव्हा आपली महत्त्वाकांक्षा आणि वाढ कुंठित होते. जेव्हा मी १९९५ साली भारतातील पहिले इंटरनेट पोर्टल सुरू केले, त्याच सुमारास याहू आणि ई-बेही दाखल होत होते. माझ्या विचारांमुळे नव्हे, तर भारतातील इंटरनेट पायाभूत सोयीसुविधांच्या अभावी- ज्या सुविधांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण होते, त्यामुळे माझ्या विकासावर मर्यादा आली. सरकारची समृद्धीविरोधी यंत्रणा नसती आणि भारतीय उद्योजकांना भरभराट होण्याची जर संधी मिळाली असती तर किती संपत्तीची निर्मिती झाली असती, याची कल्पना केलेली बरी!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत संताप खदखदत आहे. तो उत्कट स्वरूपात- पॅशनद्वारे व्यक्त होऊ शकतो किंवा विफलतेच्या रूपात स्थिर होऊ शकतो किंवा निराशेच्या रूपात बाहेर पडू शकतो. ही ऊर्जा बदल होण्याकरता वळवायला हवी. कृतीशिवाय बदल संभवत नाही. आपल्या आत खदखदणारा संताप या क्रांतीकरता इंधन पुरवेल, ज्याची भारताला गरज आहे. या संतापाला आशेचा किरण दिसण्याची आणि तो बदल घडवून आणणारा मार्ग दिसण्याची आवश्यकता आहे.

आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य मिळण्याकरता सत्ता आणि संपत्ती लोकांना परत करणे हे नई दिशाचे ध्येय आहे. आपले उमेदवार आणि प्रतिनिधी कोण असावेत हे ठरवण्याची ताकद आपल्याला असायला हवी. सरकार ज्या संपत्तीचे नियंत्रण करते, ती आपल्याला परत मिळायला हवी. या राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतराद्वारेच आपण आपल्याला संपन्न करू शकतो. आपण स्वत: जेव्हा समृद्ध होऊ, तेव्हाच आपले राष्ट्रही समृद्ध होईल.

नई दिशाची क्रांती ही आपल्यापैकी प्रत्येकाच्या भविष्याशी संबंधित आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण संपन्न होऊन आणि आपले जीवन अधिक उत्तम करणे इच्छितो. मात्र, सरकारने आणि टोकाच्या नफेखोर भांडवलदारांनी प्रत्येक स्तरावर निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे हे शक्य होऊ शकत नाही. हे सारे अडथळे मोडून काढून मुक्त होण्यासंदर्भातील ही क्रांती आहे. नई दिशा या व्यासपीठाद्वारे आपण आपले भविष्य आणि भारताला बदलू शकतो. याचे कारण म्हणजे, तुम बढोगे, देश बढेगा.

अपडेट राहा

तुमच्या व्हॉट्स अप क्रमांकावर दररोजच्या ताज्या घडामोडी मिळवा.

आपण आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद.

एसएमएस अपडेटसाठी मिस कॉल द्या ९२२३९०११११

ईमेलवर अपडेट मिळवा

आपल्या इनबॉक्समध्ये दैनिक अपडेट मिळवा

ई-मेल वर अपडेट्स नकोत का?

मोबाइलवर अपडेट मिळवा