एकत्र येऊया आणि समृद्धीच्या बाजूने मत देऊया.

बरीच वर्षे, आपल्याला आपले मत समजून घेता आले नाही. एका स्तरावर, मतदान करणे हेच आम्हाला अतर्क्य वाटायचे. आपल्या एका मताने निवडणुकीच्या निकालात काहीच बदल होत नसतो. जर आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना समान मते पडली तर तुम्ही दिलेले मत निर्णायक ठरते. मात्र, सर्वसामान्यपणे, आपले मत हे कुणाच्यातरी जिंकण्यातील तफावत वाढवते किंवा कुणाच्यातरी जिंकण्यातील तफावत कमी करते.

तर मग लोक मतदान का करतात?

याची अनेक कारणे आहेत. माझ्या मते, यामागची दोन कारणे म्हणजे कर्तव्याची भावना आणि थेट वैयक्तिक लाभ मिळण्याची आशा. पहिल्या प्रकरणात, निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला जाणून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याची भूमिका काय आहे, हे समजून घेत मतदान द्यायचे का ते ठरवायला हवे. वास्तवात मात्र, आपण चिन्ह बघून (पक्षाशी बांधिलकी जपणारे) मत देतो. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर उमेदवार लादलेले असतात. उमेदवारांना जाणून घ्यायला फारच कमी वेळ असतो किंवा वेळच नसतो. काही प्रकरणांत, उमेदवार स्थानिक रहिवासीही नसतात.

दुसऱ्या प्रकरणात, मत द्यायचे कारण समजणे खूप सोपे असते- ती एक देवघेव असते. ती पैशाची देवघेव असू शकते. मतदान करण्याआधी किंवा मतदान केल्यानंतर रोख पैसे दिले जातात किंवा ती अस्मितेची अभिव्यक्ती असू शकते. सर्व प्रकरणांमध्ये, मतदानात स्वहित जपले जाते.

‘नई दिशा’ला मतदानामागील तर्काचे आणि आकड्यांचे राजकारण समजते. एकूण मतदारांपैकी दोन तृतीयांश मतदार (६७ कोटी) कोणत्याही पक्षाशी बांधील नसतात. त्यात मतदान न करणारे, मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेतला नसलेले आणि जे मतदार अपक्ष उमेदवाराला अथवा लहान पक्षांना मतदान करतात, जे जिंकण्याची शक्यता फारच कमी असते अशा सर्वांचा समावेश असतो. या दोन तृतीयांश बहुमतातच पुढील निवडणुकीदरम्यान भारतात परिवर्तन आणण्याची संधी दडलेली आहे. व्यक्तिगत विकासासाठी अवकाश निर्माण करण्यात सर्वात मोठी संधी दडलेली आहे आणि हे करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील पाच वर्षे प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये सुपूर्द करणे. त्याचबरोबर, कराचे प्रमाण कमी केले तर लोकांच्या हातात अधिक पैसा राहतो. एकूणात, जर पुढील निवडणुकीत ‘नई दिशा’ला बहुमत मिळाले तर सरासरी, प्रत्येक कुटुंबाला पुढील पाचे वर्षे थेट साडेसात लाख रुपयांहून अधिक नफा होऊ शकतो. याला भारताच्या विकासाची घोडदौड आणि समृद्धी म्हणता येईल. त्याकरता केवळ तुमचा पाठिंबा दर्शवणारा एसेमेस हवा. हे नेटवर्क वाढविण्यासाठी १०-२० मित्रमंडळींशी आणि कुटुंबाशी तुम्ही ‘नई दिशा’विषयी बोलायला हवे आणि निवडणुकीच्या दिवशी बाहेर जाऊन मतदान करायला तुमची ३० मिनिटे हवी आहेत. ……………