भारताच्या समृद्धी क्रांतीचे नेतृत्व ‘नई दिशा’ करेल

पुढील दहा वर्षांत भारतीय दहापट श्रीमंत होऊ शकतील का? प्रतिव्यक्ती दरडोई वार्षिक उत्पन्न दहा पटीने वाढून ते सद्य स्थितीतील १.१. लाख रुपये इतके होण्याकरता ४० वर्षे लागली. त्याच कालावधीत चिनी उत्पन्न ५० पटींनी वाढले. काही क्षणांकरता तुमचे डोळे मिटून कल्पना करा, की जर तुम्ही दहा पट श्रीमंत असता तर… कारण तुम्ही श्रीमंत असायला हवे होता. पण तुम्ही नाहीत, हा तुमचा दोष नाही.

अब्जावधी भारतीयांची उत्पादनक्षमता, ऊर्जा आणि सृजनशीलता हे जगाला शक्ती देणारे इंजिन आहे. मात्र, आपण जगातील सर्वात मोठ्या समृद्धीविरोधी, गरिबीकडे नेणाऱ्या यंत्रणेद्वारे गिळंकृत केले जात आहोत : दर्जाहीन शिक्षण, मोजक्याच चांगल्या नोकऱ्या, उत्पन्न आणि नफा गिळंकृत करणारे कर आणि नियम यांनी आपण जखडून गेलो आहोत. सरकारने आपल्याला भिकारी बनवले आहे, रेशनसाठी, कर्जमाफीसाठी, आरक्षणासाठी, न्यायासाठी, जागांसाठी, नोकऱ्यांसाठी आणि स्वच्छ हवेकरताही; ज्याकरता आपण जन्माला आलेलो नाही.

१३० कोटी भारतीय दररोज शेती, वस्तू बनवणे, शिकणे, खरेदी-विक्री असा दिनक्रम अवलंबतात. त्यातील बहुतांश उत्पादकता कमी दर्जाची असते. काहीशा आशेत आणि बऱ्याचशा निराशेत आपण आपले आयुष्य जगतो. आणि आपण वाट पाहतो. आजच्यापेक्षा उद्या चांगला यावा, याची आपण वाट पाहतो. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे आजच्यापेक्षा उद्या वाईट नसावा, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.

पीपीपी- (perpetually planned poverty) – कायमची वाट्याला आलेली नियोजित गरिबी संपुष्टात आणणे हा भारतात समृद्धी निर्माण करण्याचा मार्ग आहे. ज्याचा अर्थ सरकारचा वावर कमी करणे आणि खरोखरच जी आपली संपत्ती आहे, ती प्रत्येकाला सुपूर्द करणे असा होतो. भारतातील कोणतेही सरकार स्वत:चे पंख कापून घेतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा नाही. त्यामुळे आपणच हे करायला हवे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, संपूर्ण राजकीय बदल.

तो आपल्याला दुसऱ्या प्रश्नापर्यंत आणतो. हा राजकीय बदल कोण देऊ शकेल? भारतीय राजकारणाचा वारसा नसलेले स्टार्टअपच हे करू शकेल. असे स्टार्टअप जे चौकटीच्या पलीकडचा विचार करू शकते. सार्वजनिक संपत्ती आणि सत्तेचे खरे मालक असलेल्या भारतीय नागरिकांकडे संपत्ती आणि सत्ता सुपूर्द करण्याच्या तत्त्वावर हे स्टार्टअप उभारले गेले आहे. हे स्टार्टअप आहे- नई दिशा. कुठल्याही उद्योगाप्रमाणे, यशाची शक्यता नगण्य आहे. या स्टार्ट अपचा संस्थापक म्हणून, हे करता येईल, या बाबत मला आशा आहे. येत्या काही आठवड्यांत, मी माझा प्रवास निश्चित करेन आणि एका मागोमाग एक पर्वत आपल्याला एकत्रितरीत्या कसे चढता येतील, याचाही प्रस्ताव सादर करेन.