नई दिशा यशस्वी करा

नई दिशा व्यासपीठ

भारताने समृद्ध व्हावे, याकरता स्थापन करण्यात आलेले ‘नई दिशा’ हे भारतीयांसाठी एक नाविन्यपूर्ण राजकीय व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मिती या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे हे आहे. ‘नई दिशा’ची समृद्धीची तत्त्वे आणि ‘मिशन ५४३’ यांद्वारे भारतात प्रशासनाचे आणि राजकारणाचे एक नवे प्रारूप उभे राहील.

स्वातंत्र्य, समृद्धीचे मूल्य जे जाणतात, अशा मतदारांना आणि देशात स्वातंत्र्य आणि समृद्धी यावी, याकरता आवश्यक ते करण्याची इच्छा असलेल्या सक्षम उमेदवारांना ‘नई दिशा’ एकत्र आणत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उभे राहून बहुमत मिळवत ५४३ जागा जिंकून पुढील सरकार बनवावे आणि भारताला समृद्धीच्या मार्गावर नेणारा अजेंडा राबवावा, हे ‘नई दिशा’ चे उद्दिष्ट आहे..

येत्या लोकसभा निवडणुकीत ५४३ जागा बहुमताने जिंकण्यासाठी ‘नई दिशा’ पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करते :

1. समर्थक विद्यमान राजकीय पक्षांना विश्वासू नसलेल्या पात्र भारतीय मतदारांच्या दोन तृतीयांश
2. संदेश वैयक्तिक आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करून एक साधा आणि सकारात्मक संदेश
3. व्यासपीठ व्यासपीठ जे अस्तित्वात असलेल्या श्रेणीबद्ध राजकीय पक्षांचा सामना करण्यासाठी लोकांचे नेटवर्क उपयोगात आणेल.
4. प्रायमरीज (अंतर्गत निवडणूक): उमेदवारांच्या निवडीकरता मोबाइलची ताकद उपयोगात आणून त्यातून कृतीला चालना देणाऱ्या ‘प्रायमरीज’वर आधारित हे नवे प्रारूप आहे.

‘नई दिशा’चे समर्थक

येत्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे १०० कोटी भारतीय नागरिक मतदान करण्यास पात्र ठरतील. त्यातील सुमारे एक तृतीयांश व्यक्तींच्या निष्ठा अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. आणखी एक तृतीयांश मतदान करत नाहीत आणि उर्वरित एक तृतीयांश मतदारांना कुणाला मतदान करावे, हे कळत नसते किंवा ते लहान आणि अपक्ष उमेदवारांना मतदान करतात, ज्यांची जिंकण्याची शक्यता फार कमी असते.

भारतीय कुणाला मतदान करतात?
येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकरता मतदान करण्यास पात्र असलेल्या १०० कोटी मतदारांपैकी एक तृतीयांश (अथवा ३३ कोटी) मतदार हे राजकीय पक्षांचे समर्थक असतात. त्यांना मतदारसंघातील संघटित क्षेत्र म्हणुयात:

 • १७ कोटी भाजप
 • ८ कोटी काँग्रेस आणि
 • ८ कोटी प्रादेशिक पक्ष
 • त्यांची निष्ठा पक्षाशी असते, पक्षाने निवडलेल्या उमेदवारांशी नाही. त्यांचे मत बदलण्यासाठी त्यांचे मन वळवले जाऊ शकत नाही. त्यांचे मत राजकीय पक्ष गृहित धरतात, तसेच त्यांच्यापर्यंत ‘नई दिशा’पोहोचू शकत नाही.

  उर्वरित ६७ कोटी अर्हताप्राप्त मतदार लक्ष पुरवावे असे आहेत. त्यांना मतदारसंघातील म्हणुयात.

 • सुमारे निम्मे ज्यांनी नोंदणी केलेली नसते/ किंवा ते मतदान करत नाहीत, आणि
 • सुमारे अर्धे ज्यांनी शेवटपर्यंत कुठल्या पक्षाला मतदान करायचे ते ठरवलेले नसते. ते कुठल्या एका पक्षाशी निष्ठावान नसतात. त्यांची मते अटीतटीच्या निवडणुकीत निर्णायक ठरतात.
 • मतदारांचा आणखी एक लहानसा समूह असतो- तो मत वाया घालवतो. हे मतदार कुठल्याशा लहान प्रादेशिक पक्षाला अथवा अपक्ष उमेदवाराला मतदान करतो, जो जिंकण्याची शक्यता फारच कमी असते.

  ‘नई दिशा’असंघटित क्षेत्राला संघटित करेल.
  निवडणुकीच्या बाजारपेठेत, पात्र एक तृतीयांश मतदारांचे संघटित क्षेत्र (३३ टक्के) हा महत्त्वाच्या पक्षांच्या समर्थनाचा आधार असते. त्यात भाजप हा प्रबळ खेळाडू आहे, ज्याने संघटित क्षेत्राचे अर्धे क्षेत्र काबीज केले आहे आणि अर्धे क्षेत्र इतर राजकीय पक्षांत विभागले गेले आहे.

  मात्र, लक्षात घेण्यासारखे म्हणजे - असंघटित क्षेत्र ६७ टक्के अर्हताप्राप्त मतदारांनी मिळून बनवलेले आहे. १७ टक्के वाटा असलेल्या बाजारपेठेतील आघाडीच्या पक्षापेक्षा चार पटीने असंघटित क्षेत्र मोठे आहे. या असंघटित क्षेत्राला संघटित करून राजकीय बदल घडवून आणत भारताचे आधुनिक आणि समृद्ध देशात रूपांतर करणे हे ‘नई दिशा’ चे उद्दिष्ट आहे.

  आकडेवारी आणि ‘नई दिशा’

  जगाच्या पाठीवरील लोकशाही निवडणुकांमध्ये, राजकीय पक्षांची मूलभूत धोरणे ही आपल्या समर्थकांना मतदान करण्याकरता वळवणे आणि ज्यांनी कुणाला मतदान करायचे ठरवलेले नाही, त्यांनी आपल्याला मत द्यावे, याकरता त्यांचे मन वळवणे याकरता आखलेली असतात. एखाद्या पक्षाच्या समर्थकांना त्यांचे मत बदलण्यास राजी करणे तितकेसे सोपे नाही. हे भारताकरताही तितकेच खरे आहे.

  ‘नई दिशा’ हे वास्तव जाणते आणि म्हणूनच त्यांनी भारतीय मतदारसंघातील असंघटित क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे, जो बलशाली ६७ कोटींचा बनलेला आहे. ( अथवा संघटित क्षेत्रातील सर्वात मोठ्या खेळाडूपेक्षा आकाराने चार पट आहे.)

  हा एकूणातील स्तर आहे. मात्र, जिंकण्याकरता लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर काय घडते ते महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्य मतदारसंघात १८ लाख मतदार असतात. या बहुआयामी स्पर्धेत जिंकण्यासाठी, उमेदवाराला ४-५ लाख मते प्राप्त करणे गरजेचे असते. म्हणूनच, अर्हताप्राप्त मतदारांपैकी एक चतुर्थांश पात्र मतदारांचे मतदान करण्यासाठी मन वळवणे आणि समृद्ध भविष्यासाठी मतदान करणे हे ‘नई दिशा’ पुढील आव्हान आहे.

  ‘नई दिशा’चा संदेश

  गरिबीचे निर्मुलन करणे आणि भारताला समृद्धीच्या जलद मार्गावर आणणे हे ‘नई दिशा’चे उद्दिष्ट आहे. राजकीय संलग्नता लक्षात न घेता, जरी मागील सरकारांनी, विकासाचे आश्वासन दिले, तरीही त्यातील एकही सरकार हे आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही. खरे तर भारतीय नागरीक समृद्धी निर्माण करण्यास सक्षम आहेत.

  व्यक्तिगत स्वातंत्र्य – जी समृद्धी निर्माण करण्याची पूर्वअट असते, ती पूर्ण करणे विविध सरकारांना शक्य झाले नाही, ही मूलभूत समस्या आहे. अनावश्यक हस्तक्षेपापासून मुक्त असतात, तेव्हाच लोक समृद्ध-संपन्न होतात. बऱ्याचदा संपन्नतेतील सर्वात मोठा अडथळा हा सरकारी धोरणे असतात, ज्यात नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्त होत नाही.

  काही प्रमाणात अज्ञान आणि अयोग्यता आणि काही वेळा अधिकाऱ्यांच्या खासगी लाभाच्या उद्देशापोटी आजवरच्या विविध सरकारांच्या कार्यकालात भारतीयांना समृद्धी नाकारण्यात आली. आर्थिक धोरणे आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (नरेगा), शेती कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून देणे यांतून दीर्घकाळ टिकणारी समृद्धी येऊ शकत नाही. व्यावसायिक कामकाजात सरकारच्या वाढत्या वावराने संपत्ती निर्माण होऊ शकत नाही, उलटपक्षी, व्यक्तींनी निर्माण केलेली थोडीथोडकी संपत्तीही नष्ट होऊ शकते. सरकारी नोकऱ्यांतील आणि शिक्षणातील आरक्षण वाढवण्यासारख्या दूरदृष्टी नसलेल्या धोरणांतूनही संपत्ती निर्माण होऊ शकत नाही.

  सरकारी हस्तक्षेपापासून आणि नियमांच्या कचाट्यातून सुटत प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची समृद्धी आणि प्रगतीकरता मूलभूत स्वातंत्र्य लाभणे हा मूलभूत बदल भारतात होणे आवश्यक आहे.

  ‘नई दिशा’चे उद्दिष्ट आणि धोरण
  भारताला स्वातंत्र्याच्या आणि समृद्धीच्या नव्या दिशेला नेणे हे ‘नई दिशा’ चे उद्दिष्ट आहे. संपत्ती निर्मितीकरता जनतेला आर्थिक स्वातंत्र्य लाभणे ही पूर्वअट असते. लक्षात ठेवा, केवळ लोक संपत्ती निर्माण करू शकतात, सरकार नाही. ज्या लोकांपुढे गंभीर आर्थिक अडचणी असतात, त्यांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर पडणे कठीण असते.

  म्हणूनच, ‘नई दिशा’ चे पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे- गरीब अथवा श्रीमंत अशा सर्व भारतीयांना जी त्यांची संपत्ती आहे, मात्र जी सरकारी नियंत्रणामुळे कुलुपबंद झाली आहे, ती सुपूर्द करणे. ही मोठ्या प्रमाणातील संपत्ती, भारतीय नागरिकांना परत करायला हवी आणि जी लोकांना त्यांचे आर्थिक इंजिन सुरू करण्यासाठी सुरुवातीचे वित्तीय भांडवल म्हणून उपयोगात येऊ शकेल.

  थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये देण्यात येतील. ही रक्कम जी सरकार जमा करते- उदा. काही गटांवर कर लादत ती रक्कम इतरांना दिली जाते (या सौद्यात ते स्वत:ला श्रीमंत बनवतात.) एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे संपत्ती हस्तांतरित करून कुठलाच देश श्रीमंत बनलेला नाही. जे स्रोत सरकारच्या ताब्यात आहेत, ते खुले करत आणि त्यांचा उत्पादक वापर करून हा निधी उभारण्यात येईल.

  सध्या गरिबीच्या खाईत असलेल्या लक्षावधी कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी एक लाख रुपये देण्यात येतील. ही रक्कम उत्पादक उपक्रमांसाठी वापरून गरीबांना एका तऱ्हेने त्यांचा वित्तीय पाया रचता येईल. या रकमेद्वारे अन्न, कपडे, निवारा, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा आदींविषयक व्यक्तिगत वापर वाढेल. या वाढत्या वापराने उत्पादनांची आणि सेवांची मागणी वाढेल आणि त्यामुळे नव्या नोकऱ्या निर्माण होतील आणि त्यातून उत्पन्नही वाढेल. अशा प्रकारे उत्पादनाचे आणि वापराचे एक चांगले चक्र सुरू होईल.

  एका भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न प्रतिवर्षी केवळ १.२ लाख रुपये असते. कुटुंबांची सरासरी निव्वळ संपत्ती (कर्जातून बचत वजा करता) शून्याच्या जवळ जाणारी आहे आणि महत्त्वाचा भाग खरे तर उणे असतो. लक्षावधी गरीब कुटुंबे ही केवळ एका गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे भयंकर दुर्बल होऊ शकतात. प्रतिवर्षी एक लाख रुपये संपत्तीची हमी त्यांना आवश्यक ती सुरक्षिततेचे कवच प्रदान करेल आणि त्यांच्या जगण्याचा कायापालट होईल.

  दुसरे पाऊल म्हणजे ‘नई दिशा’ सर्व कर कमी करणार आहे.सध्या सरकार उत्पन्नावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर लावते आणि कर भरून मिळालेल्या उर्वरित उत्पन्नातून केलेल्या खरेदीवरही कर लावला जातो.

  या दोन पावलांमुळे महत्त्वाचे परिणाम होतील. पहिले, यामुळे अधिक पैसा लोकांच्या हातात राहील (संपत्तीचे निर्माते), जो पैसा ते त्यांना हवे तसे वापरू शकतील. सध्या, सरकार लोकांवर भरमसाठ कर लादत असल्याने, लोकांच्या उत्पन्नावर सरकारचे अयोग्य नियंत्रण राहते. हे गुलामगिरीचेच लक्षण आहे. १० टक्के करमर्यादेमुळे दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे राष्ट्राची संपत्ती वाया घालवण्यापासून सरकारला थांबवता येईल.

  ‘नई दिशा’ ची घोषणा: तुम बढोगे, देश बढेगा
  आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी सरकारला येण्यापासून थांबवणे आणि हे केंद्रस्थान व्यक्तीवर केंद्रित करणे याची वेळ आली आहे. आमचा एकमेव, सोपा आणि सकारात्मक संदेश हा आहे- ‘तुम बढोगे, देश बढेगा’. तुमचा जसा विकास होईल आणि तुम्ही जसे समृद्ध व्हाल, तसा भारतही होईल. हा संदेश ६७ कोटी- कुठल्याही पक्षाशी निष्ठा नसलेल्या देशभरातील मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा.

  ‘नई दिशा’ चे व्यासपीठ

  पारंपरिकरीत्या, भारतीय राजकीय पक्ष श्रेणीबद्ध- वरूनखाली आणि अधिकारांच्या अत्यंत केंद्रीकरणाने ग्रस्त आहेत. सत्ता ही वरिष्ठांच्या हातात एकवटली आहे आणि ती वरपासून खाली श्रेणीनुसार येते. खूपच कमी लोकांना सर्व निर्णय घेता येतात.

  काय चालले आहे, यांवर श्रेणीतील खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तींचा खूपच कमी प्रभाव असतो. यांत उमेदवारांची निवड आणि निवडणूक लढणे या गोष्टींचाही समावेश आहे. हे लोकशाही संकल्पनेच्या विरोधी आहे, जिथे राजकीय उमेदवार हे लोकांचे प्रतिनिधी असतात. ‘नई दिशा’च्या उमेदवारांना केवळ पक्षाच्या नेत्यांनी निवडलेले नसते आणि केवळ निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडून द्यावे म्हणून ते लोकांवर दबाव टाकत नाहीत.

  पारंपरिक पक्षातील श्रेणीव्यवस्थेने भ्रष्टाचाराच्या संधी निर्माण होतात. तिकीट मिळण्याकरता सर्वाधिक पैसे देईल, त्याला पक्ष उमेदवार म्हणून पक्षातर्फे घोषित केले जाते.उमेदवाराची स्पर्धात्मकता नैतिक सत्यता, परिश्रम आणि चैतन्य लक्षात घेतले जात नाही. यामुळे खराब प्रशासन आणि उदासीन धोरण निर्मिती यांची संभाव्यता निर्माण होते.

  ‘नई दिशा’ या केंद्रीय नियंत्रणाखाली, श्रेणीबद्ध सत्ता व्यवस्थेचे प्रारूप वरपासून खालपर्यंत बदलून टाकणार आहे. ‘नई दिशा’चे व्यासपीठ लोकांच्या आवाजाचा सन्मान करेल आणि त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्यास वाव देईल.

  नेटवर्क आणि श्रेणीबद्धता
  ‘नई दिशा’ या केंद्रीय नियंत्रणाखाली, श्रेणीबद्ध सत्ता व्यवस्थेचे प्रारूप वरपासून खालपर्यंत बदलून टाकणार आहे. ‘नई दिशा’चे व्यासपीठ लोकांच्या आवाजाचा सन्मान करेल आणि त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्यास वाव देईल.

  आजच्या तंत्रज्ञानाद्वारे नेतृत्व प्राप्त करणे शक्य झाले आहे, जे लोकांच्या इच्छेला प्रतिसाद देणारे असेल. लोक स्वत: निवड करण्यास सबल असतील. मात्र, पारंपरिक राजकीय पक्षाचे नेते सत्ता सोडण्याचे आणि जनतेच्या हातात सत्ता सुपूर्द करण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. याच बाबतीत पहिल्यांदाच जनतेला त्यांचा उमेदवार निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारे ‘नई दिशा’ हे राजकीय व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावते.

  ‘नई दिशा’ हे राजकीय व्यासपीठ लोकशाहीची सक्षमपणे अमलबजावणी करते. पारदर्शी मतप्रक्रियेद्वारे स्वत:चा उमेदवार निवडून स्वत:चे भाग्य लोकांनी स्वत: निवडावे, अशा तऱ्हेने ‘नई दिशा’हे राजकीय व्यासपीठ लोकशाहीची सक्षमपणे अमलबजावणी करते.

  ‘नई दिशा’ चे व्यासपीठ आणि पारंपरिक राजकीय पक्ष यांच्यातील तफावत
  सुमारे प्रत्येक बाबतीत – संस्थात्मक व्यवस्थेपासून उमेदवार निवडीपर्यंत, निधी उभारणीपासून निवडणुकीच्या प्रचारापर्यंत राजकीय पक्षांमधील तफावत आणि ‘नई दिशा’ व्यासपीठ यांच्यात बराच फरक आहे. ही तफावत संपूर्ण आणि व्यापक आहे.

  ‘नई दिशा’चे प्राथमिक मॉडेल

  तंत्रज्ञानाचा आधुनिक चमत्कार असलेले मोबाइल नेटवर्क – तंत्रज्ञान उपलब्ध करून देते- ज्याद्वारे ‘नई दिशा’ व्यासपीठाला बळ प्राप्त होते. साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात मोबाइल फोन आहे आणि त्यातील अर्ध्यांकडे पुढील वर्षापर्यंत स्मार्टफोनद्वारे इंटरनेट उपलब्ध होईल. त्याद्वारे याआधी उपलब्ध नसलेली मित्र आणि कुटुंबाशी कनेक्टिव्हिटी प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होईल.

  ते या चळवळीचा भाग आहेत, जी चळवळ प्रशासनामध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणेल, हे जाणून घेण्याची क्षमता ‘नई दिशा’च्या व्यासपीठाद्वारे सदस्यांना प्राप्त होईल. सर्वांना पाहता यावी, याकरता सदस्यत्वासंबंधातील माहिती उपलब्ध केली जाईल आणि म्हणूनच त्यांच्या पाठिंब्याला असलेल्या महत्त्वाची जाणीव करून देतो.

  ‘नई दिशा’ सदस्य
  कोणताही मतदार त्यांच्या मतदारपत्राच्या सहाय्याने साइन अप करून ‘नई दिशा’चा सदस्य बनू शकतो. ‘साइन अप’मध्ये ‘नई दिशा’च्या तत्त्वांची स्वीकृती आहे. प्रत्येक ‘नई दिशा’च सदस्याचे तीन संबंधित क्रमांक आहेत :

 • सदस्यत्वाचा क्रमांक: त्याद्वारे ‘नई दिशा’त सहभागी होण्याचा क्रम दर्शवला जाईल. लवकर नाव नोंदणी करणाऱ्यांचा क्रमांक खालचा असेल.
 • जितक्या जणांना सांगाल: त्याची मोजणी होईल. ‘नई दिशा’च्या सदस्याने इतर किती जणांना ‘नई दिशा’बद्दल सांगितले हे त्यातून दर्शवले जाईल.
 • उपक्रमांचा निर्देशांक: यातून सहभागाची मोजणी करण्यात येईल.
 • सदस्यांच्या उपक्रमांमध्ये ‘नई दिशा’ संबंधीचे लिखाण शेअर करणे, लोकांना ‘नई दिशा’मध्ये साइनिंग अप करणे, ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, त्यांना नोंदणीकरता मदत करणे. सदस्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकेल असा सदस्य निवडणे.

  ‘नई दिशा’चा उमेदवार
  पारंपरिक राजकीय पक्षांची कामाची पद्धत म्हणजे वरून खालपर्यंत- म्हणजेच त्यांचे वरिष्ठ नेते हे प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची निवड करतात आणि मतदारांना खूपच कमी पर्याय शिल्लक असतात. ‘नई दिशा’ च्या प्रारूपात, मतदारसंघातील नागरिक उमेदवार म्हणून उभे राहू शकतात आणि त्याला अंतर्गत निवडणुकीत (प्रायमरीज) ‘नई दिशा’चे सदस्य मत देतील.

  निवडणूक कुणी लढवायची, याबाबत ‘नई दिशा’ व्यासपीठ आपला उमेदवार कुणावर लादणार नाही. ‘नई दिशा’ ची सदस्य असलेली कुणीही व्यक्ती निवडणूक लढवू शकेल. अंतर्गत निवडणुकीतून निवडला गेलेला कुणीही सदस्य उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहू शकेल. सदस्यांचा ‘नई दिशा’च्या तत्त्वांना पाठिंबा असल्याने ‘नई दिशा’च्या तत्त्वांना उमेदवाराची अप्रत्यक्ष मान्यता असतेच.

  ‘नई दिशा’ची प्राथमिक अंतर्गत निवडणूक
  ‘प्रायमरीज’ ही ‘नई दिशा’च्या व्यासपीठावरील एक अंतर्गत निवडणूक असून त्यात सदस्य त्यांचे उमेदवार निवडतात. ‘प्रायमरीज’द्वारे, ‘नई दिशा’ भारतासाठी एक नवी दिशा दर्शवत आहे, ज्यात ज्या व्यक्ती कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, अशा खऱ्या बहुमताची शक्ती एकवटली जात आहे. ‘नई दिशा’चे सदस्य त्यांचा लोकसभेचा सदस्य कोण असेल, ते निवडू शकतात, त्याचबरोबर ते पंतप्रधान कोण असेल तेही निवडू शकतात.

  अंतर्गत निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन सदस्य त्यांच्या तीन क्रमांकाद्वारे करू शकतात आणि व्यासपीठावर त्यांच्याबाबत नोंदवलेली मते प्रकाशित केली जातील. अशा क्राऊडसोर्सिंगद्वारे मतदारसंघातील सदस्यांच्या एकत्रित ज्ञानाद्वारे या कामासाठी सर्वात योग्य व्यक्ती निवडली जाईल.

  एखाद्या विशिष्ट मतदारसंघात ५ टक्के मतदार ‘नई दिशा’चे सदस्य असतील, ही अंतर्गत निवडणुकीची पूर्वअट आहे. मतदान प्रक्रिया दूषित करण्याचे इतर राजकीय पक्षांच्या समर्थकांचे संभाव्य प्रयत्न लक्षात घेता, जर त्या मतदारसंघात मतदार ५ टक्के असला तर हा नकारात्मक परिणाम साध्य होणार नाही. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शी असेल.

  पालिका / पंचायत आणि विधानसभा अशा दोन्ही स्तरांवर अंतर्गत निवडणुका असतील. लोकसभेत जर ‘नई दिशा’च्या सदस्यांना बहुमत प्राप्त झाले तर पुढील पंतप्रधान कोण असेल ते त्यांचे निवडून आलेले खासदार निवडतील.

  या प्रायमरी प्रारूपाद्वारे, ‘नई दिशा’ सर्व स्तरांवरील सरकारमध्ये मोठा बदल घडवून आणेल आणि सार्वजनिक जीवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नव्या लोकांची तळागाळातून बांधलेली संस्था उभारली जाईल.

  सारांश : ‘नई दिशा’ – भारतीयांसाठी एक नवी दिशा

  ‘नई दिशा’ ही शब्दश: एक नवी दिशा आहे, एका वेगळ्या भविष्याकडे नेणारा स्वातंत्र्य आणि समृद्धीचा मार्ग. समृद्धीसाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी स्वातंत्र्य ही आवश्यक पूर्वअट आहे. नागरिक उपभोगणाऱ्या स्वातंत्र्याचा परिणाम म्हणजे राष्ट्राची संपत्ती. ज्या राष्ट्राचे नागरिक स्वतंत्र नाहीत, तो देश कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.

  ‘नई दिशा’ हे तथ्य जाणते. भारतीयांना खरंच स्वतंत्र करण्याकरता, सरकारने नागरिकांच्या प्रत्येक बाबीत नाक खुपसणे आणि आपले निर्णय लादणे थांबवायला हवे. भारतातील राजकीय पक्ष जे स्वातंत्र्य देऊ इच्छितात, त्यातून कधीच स्वातंत्र्य येऊ शकत नाही. म्हणूनच, आपण जनतेने व्यक्तिगत स्वातंत्र्य- आर्थिक, नागरी आणि राजकीय स्वातंत्र्य देणारे सरकार निवडून द्यायला हवे.s.

  ‘नई दिशा’ हे भारताला स्वतंत्र करण्याचे आणि त्यातूनच भारताला विकसित आणि श्रीमंत राष्ट्र बनविण्याचे राजकीय व्यासपीठ आहे. याद्वारे वैयक्तिक मतदार मतदानाच्या प्रक्रियेच्या समोर आणि केंद्रस्थानी येईल आणि त्यातून मतदानाच्या निर्णयाचे ते नियंत्रण करू शकतील.

  अशा प्रकारे ‘नई दिशा’ संपत्ती खऱ्या मालकांकडे- लोकांकडे सुपूर्द करत आहे. याद्वारे भारताच्या नागरिकांना त्यांचे भाग्य निवडण्याची आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळून यश प्राप्त करण्याची शक्तीही देत आहे. भारतात अस्तित्वात असलेला प्रत्येक राजकीय पक्ष सरकारी हस्तक्षेप वाढवतो आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आकुंचित करतो. मात्र, आता त्यांचे दिवस भरले आहेत.

  ‘नई दिशा’चा सर्व भारतीयांना संदेश आहे : तुमचे स्वातंत्र्य म्हणजे तुमची समृद्धी. तुमची समृद्धी म्हणजे देशाची समृद्धी. तुमच्या स्वातंत्र्यात सरकार अडथळा ठरतो आणि म्हणून राष्ट्राच्या समृद्धीतही सरकार अडथळा आहे. दडपशाही करणाऱ्या सरकारपासून तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व जाणणारे आणि म्हणूनच समृद्धीला चालना देणाऱ्या आगामी सरकारला तुमचे अमूल्य मत देऊन तुम्ही हे घडवू शकाल.

  आता तुम्ही भूमिका घेण्याची वेळ आली आहे, कारण ‘तुम बढोगे, देश बढेगा.’

  आमच्यासाठी प्रश्न आहेत का ?