तुम्हारा ना जन्म ना मृत्यू,
नाश ना विनाश,
तुम तो अमृत के संतान हो,
तुम्हे किस बात का डर है ?

- स्वामी विवेकानंद

प्रयोजनाचे निवेदन

राजेश जैन

मी मूळ उद्योजक आहे, उद्योजक तो असतो, जो विखुरलेले, असंबद्ध भाग एकत्र आणण्याऐवजी लोकांसाठी ज्याचे मूल्य अधिक असेल, अशा अस्तित्वात असलेल्या तुकड्यांना एकत्र जोडतो. मूल्यनिर्मिती म्हणजेच संपत्तीनिर्मिती.

मी तंत्रज्ञानविषयक उद्योजक असल्यामुळे मला जे हवे होते, समाजाकरता जी काही मूल्यनिर्मिती मला करता येणे शक्य होती, ती मी केली. परिणामत: मला व्यक्तिगत मिळालेले यश हा त्याचा एक साइड इफेक्ट होता, मात्र वैयक्तिक संपत्ती प्राप्त करणे ही माझी प्राथमिक प्रेरणा नाही.

लोक ज्याबाबत असमाधानी असतात, ते बदलण्यासाठी ते प्रवृत्त होतात. माझ्या बाबतीत, हे असमाधान हा एका प्रकारे असा साक्षात्कार होता ,की आपण भारतीयांना जितके शक्य आहे, तितके आपण संपादन करू शकलेलो नाहीत. इतर श्रीमंत राष्ट्रांसारखे, भारताकडे यश मिळवण्यासाठी आवश्यक ते सारे काही आहे. तरीही, भारत आज जो बनू शकतो, तो बनलेला नाही. शेकडो लक्षावधी भारतीय गरीब आहेत. आपण ते नसू शकतो, आपल्याला बदलायला हवे, आपण बदलायला हवे.

आपल्या सर्वांची स्वप्ने आहेत, उद्दिष्टे आहेत आणि आपल्यात महत्त्वाकांक्षाही आहे. मला कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, कारण मी जो आहे, तो असा नाही. मी उद्योजक आहे, राजकारणी नाही आणि मला कधीही राजकारणी व्हायचेनाही. माझे स्वप्न आणि माझी महत्त्वाकांक्षा ही भारताला समृद्ध बनवणे आहे. उद्योजक म्हणून मला ठाऊक आहे की, ही गोष्ट संपादन करता येईल आणि मला विश्वास आहे की, त्याकरता काय करणे आवश्यक आहे, ते मला माहीत आहे.

माझ्या मते, संपत्ती निर्मितीकरता आवश्यक असलेले स्वातंत्र्य नाकारणारी ही व्यवस्थाच भारताला आपल्या नशिबात असलेले प्राप्त करण्यास अडथळा ठरत आहे. ही व्यवस्था म्हणजे सरकार जे आपले धनी बनले आहेत आणि आपल्यावर राज्य करत आहेत, त्यांच्या हव्यासासाठी आपल्याला चाकर बनवत आहेत. ही व्यवस्था मोडायला हवी, त्याचे मूळ आणि शाखांसहित! आपल्याला व्यवस्था बदलायला हवी, केवळ एका राजकीय पक्षाच्या जागी दुसरा पक्ष किंवा एका सरकारच्या जागी दुसऱ्याचे सरकार येणे इतपतच हा बदल राहता कामा नये.

आपण सारे मिळून ही व्यवस्था बदलू शकतो आणि आपण ती बदलायला हवी. आपला लढा हा कुणा एका विशिष्ट राजकारण्याच्या विरोधात अथवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही प्रत्येक सरकारविरोधात आहोत, जे आमच्यावर हुकूम गाजवतात, राज्य करतात, ज्यांनी आपली संपत्ती चुकीच्या पद्धतीने रोखून धरली आहे, ज्यामुळे आमचा विकास खुरटला आहे.

मी विवेकानंद यांची कृती करण्याची साद गांभीर्याने घेत आहे. त्यांनी म्हटले आहे,

तुम्हारा ना जन्म ना मृत्यू,

नाश ना विनाश,

तुम तो अमृत के संतान हो,

तुम्हे किस बात का डर है ?

आपण अमर्त्य, जे नाश पावू शकत नाही, अशांची लेकरे आहोत. आपल्याला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही. जे आमच्यावर राज्य गाजवतात, ते शक्तिशाली आहेत, मात्र आपण एकत्रितरित्या सारे त्यांच्याहून अधिक शक्तिमान आहोत. आपण सारे एकत्र येऊन आपल्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या शक्तींची भीती न बाळगता आपल्या समृद्धीचा मार्ग तयार करूयात.

आपण भारतासाठी नवी दिशा रेखाटायला हवी. हे करणे आपण आपल्याला देणे लागतो. भावी पिढ्यांकरता आपण हे करायला हवे.

राजेश जैन यांना भेटा !

आम्ही भारताला समृद्ध करू शकतो - पिढ्यांपासून नव्हे, तर दोन निवडणुकांमध्ये. 130 कोटी भारतीयांचे भविष्य आज आपण जे करतो त्यावर अवलंबून आहे. आपण आणखी वेळ वाया जाऊ देऊ नये.

१९९० च्या उत्तरार्धात तंत्रज्ञान उद्योजक आणि आशियातील डॉट कॉम क्रांतीमध्ये अग्रणी म्हणून राजेशने भारताचे पहिले इंटरनेट पोर्टल बनविले. त्यानंतर त्यांनी आज भारताची सर्वात मोठी डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. राजेश उद्योजक म्हणून काम करीत आहेत परंतु एका वेगळ्या क्षेत्रात- राष्ट्र उभारणीत आहे.