भारताच्या समृद्धीच्या विरोधी यंत्रणेचा चक्काचूर करण्यासाठी

भारताने जगातील सर्वात मोठे समृद्धीविरोधी यंत्रणा कशी तयार केली? ध्यानात ठेवा, ही यंत्रणा मशीनसारखीच आहे. जी युवा वर्गाच्या ऊर्जेला केराची टोपली दाखवते, मध्यमवर्गाची सकारात्मकता आणि पैसा शोषून घेते, उद्योजकांची सृजनशीलता आणि ऊर्जा काढून घेते, लहान शेतकऱ्यांना छळ करून त्यांना खोल दु:खात नेते, आणि केवळ वरिष्ठ पातळीवरील सत्ताधाऱ्यांना आणि नफेखोर मित्रांना समृद्ध करते. अशा या मशीनचा शोध कुणी बरे लावला?

हे ब्रिटिशांचे काम असे एक उत्तर असू शकते किंवा हे मुघलांनी केले असेही उत्तर मिळू शकते किंवा इतर कुणी केले असेही कुणी सांगते. असो. आपण उत्तर मिळवण्यासाठी शंभर वर्षे मागे जाऊ शकतो किंवा पाचशे वर्षेही… खरे तर उत्तराने काहीही फरक पडणार नाही. हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, की आपण त्याविषयी काय करणार आहोत?

कारण प्रत्येक दिवशी आपण हरतोय, आपण कोट्यवधी भारतीयांना गरिबीत ठेवतोय, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवेपासून त्यांना वंचित ठेवतोय, आपण त्यांच्या नोकरीच्या संधी मर्यादित करतोय, आपण आपल्याला आणि त्यांना उत्तम जिण्यापासून वंचित ठेवत आहोत. आपण मथळ्यांतून सातत्याने घडणारे अध:पतन लक्षात घेत नाही, ज्यात केवळ आपला मनाचा कप्पा व्यापणारी नोंद असते. मात्र, कोट्यवधी लोक दररोज पुन:पुन्हा मारले जातात आणि त्याची दखल ना प्रसारमाध्यमे घेत ना मेसेजिंग अँप्स.

पुन्हा आपण प्रश्नाकडे परतूयात. आपण याविषयी काय करणार आहोत?

काही वर्षांपूर्वी मी याविषयी विचार करायला सुरुवात केली. उद्योजकासाठी प्रत्येक समस्या ही एक संधी असते. बंद असलेल्या प्रत्येक दाराला किल्ली असते. मी स्वत:ला विचारले : समृद्धीच्या विरोधात असलेल्या या यंत्रणेचा नायनाट करून आपल्या सर्वांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी काय करावे लागेल? आणि माझे उत्तर स्पष्ट होते : एक नवे अस्तित्व, एक नवे स्टार्टअप- भूतकाळाच्या वारशाची बाधा न झालेले. केवळ वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करणारे.

नई दिशाच्या निर्मितीसाठी ही एक प्रेरणा होती. भविष्यकालीन समृद्धीची उत्तरे ही आपल्यात- आपल्या देशात आणि आपल्या कृतीत दडलेली आहेत. १८५७ मध्ये पडलेल्या क्रांतीच्या ठिणगीचे, १९४२ मध्ये पुन्हा पुनरुत्थान झाले आणि नंतर ती विस्मृतीत गेली. क्रांतीचा पुन्हा प्रारंभ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

त्यासाठी आपण तयार आहोत का?