तुम बढोगे, देश बढेगा

भारत कधीही गरीब देश नव्हता. इतिहासाच्या प्रारंभापासून, भारत हा जगभरातील व्यापाऱ्यांसाठी आणि आक्रमणकर्त्यांसाठी जणू चुंबक होता. १९४७ साली जेव्हा अंतिमत: भारत स्वतंत्र झाला, तेव्हा तोपर्यंत चालत आलेली लूट थांबेल आणि भारतीय त्यांच्या सरकारच्या अखत्यारीत समृद्ध होतील, अशी आशा साऱ्यांना वाटत होती.

आपल्याला फारशी माहिती नाही. सत्ताधारी बदलले, पण नियम बदलले नाहीत. म्हणून परिणामही बदलले नाहीत. आकडे खोटे बोलत नाहीत. कुठलीही आकडेवारी आपण पाहिली, तरी त्यातून हेच स्पष्ट होते की, समृद्धी अद्याप आलेली नाही.

जेव्हा भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि सत्ताधाऱ्यांच्या त्वचेचा रंग जरी बदलला, भारतीयांना खरोखरीच स्वातंत्र्य मिळाले नाही. भारत सरकार हे राज बनले. जनतेची संपत्ती सरकारकडे राहिली. एकामागोमाग एक आलेल्या सरकारने जास्तीत जास्त सत्ता व संपत्ती उपभोगण्यासाठी अंतर्निहित विभागांचे शोषण केले. नियमांमागोमाग नियम, नियंत्रणांमागोमाग नियंत्रणे, अध्यादेशांमागोमाग अध्यादेश, निवाड्यांमागोमाग निवाडे, धोरणांमागोमाग धोरणे आणि वर्षांमागून वर्षे त्यांनी जगभरातील सर्वात महान समृद्धीविरोधी यंत्रणा उभारली.

हे संपुष्टात येऊ शकते आणि हे संपुष्टात यायला हवे. या यंत्रणेचा नाश व्हायला हवा. हे केवळ दोन सोप्या टप्प्यांत होऊ शकते. भारतातील प्रत्येक कुटुंबाला सार्वजनिक संपत्तीतील त्यांचा एक लाख रुपयांचा वाटा प्रत्येक वर्षी सुपूर्द करायला हवा आणि कर मर्यादा १० टक्के असायला हवी. लोकांच्या हातात पैसा ठेवण्यापेक्षा, या नव्या पुढाकाराने प्रत्येक भारतीय कुटुंबाकरता एक सुरक्षा कवच निर्माण होईल, गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वेगवेगळ्या क्षेत्रांतील वावर कमी होईल. भारतीय नागरिकांच्या संपत्ती निर्मितीकरता सबलीकरण होईल. हे झाले तरच आपण समृद्धीपर्यंत पोहोचू.

मात्र, अर्थातच सत्तेच्या साधनांवर ज्यांचा ताबा आहे, अशा व्यक्ती हे करणार नाहीत आणि म्हणूनच नई दिशा या राजकीय स्टार्ट अपने प्रवेश केला आहे. सुमारे ६७ कोटी म्हणजेच दोन तृतीयांश भारतीय हे समृद्धीविरोधी यंत्रणेच्या निर्मात्यांचे निष्ठावान निर्माते नाही. जर २० कोटी म्हणजेच एक तृतीयांश मतदार एकत्र आले, तर आपण प्रत्येक भारतीयाचे भविष्य बदलू शकतो.

नई दिशा आपल्याविषयी आहे. आपण सर्वांनी भूमिका घ्यायला हवी आणि आपले भविष्य बदलायला हवे. भारतीयांना ज्याची अत्यंत आवश्यकता आहे, अशी सुरुवातीला राजकीय आणि नंतर आर्थिक क्रांती घडविण्यासाठी नई दिशा हे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सार्वजनिक संपत्ती आणि सत्तेतील योग्य वाटा ज्यांच्या मालकीचा आहे, त्या आपल्या सर्वांना- नागरिकांना सुपूर्द करण्यासाठी हा सारा प्रयत्न आहे. तुम्ही तयार आहात का? कारण तुम बढोगे, देश बढेगा.

अपडेट राहा

तुमच्या व्हॉट्स अप क्रमांकावर दररोजच्या ताज्या घडामोडी मिळवा.

आपण आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद.

एसएमएस अपडेटसाठी मिस कॉल द्या ९२२३९०११११

ईमेलवर अपडेट मिळवा

आपल्या इनबॉक्समध्ये दैनिक अपडेट मिळवा

ई-मेल वर अपडेट्स नकोत का?

मोबाइलवर अपडेट मिळवा