हवे आहेत : भारताचे पहिले समृद्धी पंतप्रधान! (भाग दुसरा)

आपण ज्यांना मत दिले, त्या पंतप्रधानांकडे परत जाऊया.

राष्ट्र म्हणून, आपण पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू यांना मत दिले. ती आपली पहिली सामूहिक चूक होती. अर्थात, आपल्याला काही पर्यायही नव्हता. गांधींनी आपल्या वतीने निर्णय घेतला- त्याआधी काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सर्वोच्च पदासाठी वल्लभभाई पटेल यांच्याविरोधात एकतर्फी मत व्यक्त करून! तर मग नेहरूंची निवड झाली. त्यांनी केलेल्या सर्वात मोठ्या दोन चुका म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीसाठी त्यांनी ब्रिटिश संसदीय प्रणाली निवडली आणि अर्थकारणाकरता केंद्रीय नियोजनाचे सोव्हिएत प्रारूप निवडले. या दोन्हीही प्रकरणात, त्याहून अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होते- अमेरिकी प्रारूप- ज्या घटनेत अध्यक्षीय सरकारची सत्ता विविध घटकांमध्ये विभाजित होते आणि ज्यात व्यक्तिगत अधिकारांची हमी असते, जे प्रारूप व्यक्तिगत स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी लोकांना आर्थिक स्वातंत्र्याची हमी देते.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने स्वत:ला सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक असल्याचे दाखवून दिले. भारताने अमेरिकेची घटना आणि आर्थिक प्रारूपाचा कित्ता गिरवायला हवा होता. मात्र, भारताला चुकीच्या मार्गावर ढकलले गेले. पंतप्रधानांना अमर्यादित सत्ता देणारे संसदीय प्रारूप (आपण आणीबाणीच्या वेळेस ते पाहिले.) आणि एक आर्थिक प्रारूप ज्याने अशा हातांमध्ये सत्ता ठेवली, जे स्वत:ला, दरनिहाय व्यवस्थेद्वारे बाजारपेठेत संवाद साधणाऱ्या स्वतंत्र व्यक्तींच्या निर्णयक्षमतेपेक्षा आपल्याला अधिक समजते असे मानत असत.

इतर कशाहीपेक्षा, समाजवादाचा पाठपुरावा करण्याचा नेहरूंचा निर्णय ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक चूक असू शकेल. त्यातूनच समृद्धीविरोधी यंत्रणा निर्माण झाली, भारताच्या स्वातंत्र्यापासून ज्या यंत्रणेने लक्षावधींचे जिणे नष्ट केले आणि जी यंत्रणा नष्ट करणे कठीण आहे.

एकदा का एक पायंडा पडला, तर तो माघारी घेणे कठीण असते. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून तो आणखी पुढे नेला. सरकारचा आवाका वाढला- बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले, परवाना पद्धत, कोटा पद्धतीला आणखी बळकटी मिळाली आणि एके दिवशी आपले सर्व मूलभूत हक्क आणीबाणी लादून संपुष्टात आणले गेले.

अर्थात, आपण भारतीयांनीच त्यांना मत दिले होते आणि आणखी काही वर्षांनंतर आपण त्यांना पुन्हा मत दिले. आजमितीस, समृद्धीविरोधी यंत्रणा अधिक शक्तिशाली बनली आहे.